खासदार रक्षाताई खडसे यांचा विजय निश्चित : मंत्री गिरीश महाजन

जामनेर तालुक्यात प्रचार दौरा : मतदारांकडून खासदारांचे स्वागत

0

जामनेर : रावेर लोकसभा निवडणुकीतील महायुती व भाजपाच्या उमेदवार खासदार रक्षाताई खडसे यांच्या विजयासाठी मंत्री गिरीश महाजन यांनीदेखील ताकद लावली आहे. सलग तिसर्‍यांदा खासदार रक्षाताई या विजयी होतील, असा विश्वास यावेळी मंत्री महाजनांनी व्यक्त केला. रावेर लोकसभा महायुती व भाजपा उमेदवार खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी जामनेर तालुक्यातील मौजे फत्तेपूर, गोद्री, किन्ही, ढालसिंगी, तोंडापूर, भारुडखेडा, कुंभारी खु., वडाळी, वाकोद, पहुरपेठ, पहूर कसबे, पाळधी आदी गावांमध्ये भाजपा नेते मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत प्रचार केला.

भाजपाला मतदानाचे आवाहन
सार्वत्रिक निवडणुक 2024 मध्ये रावेर लोकसभा क्षेत्र भाजपा व महायुती अधिकृत उमेदवार खासदार रक्षाताई खडसे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यासह भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, रासप, मनसे ई. मित्र पक्षाच्या पदाधिकारी यांच्यासह जामनेर तालुक्यातील मौजे फत्तेपूर, गोद्री, किन्ही, ढालसिंगी, तोंडापूर, भारुडखेडा, कुंभारी खु., वडाळी, वाकोद, पहुरपेठ, पहूर कसबे, पाळधी आदी गावांमध्ये प्रचारार्थ भेट देऊन, मतदारांशी संवाद साधला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांना सलग तिसर्‍यांदा प्रधानमंत्री बनविण्यासाठी जास्तीत-जास्त संख्येने भाजपा ला मतदान करण्याचे यावेळी आवाहन केले.


कॉपी करू नका.