वंचित आघाडीचे उमेदवार संजय ब्राह्मणे यांची आज भुसावळसह कंडारी कॉर्नर सभा

0

भुसावळ : रावेर लोकसभेतील वंचित आघाडीचे उमेदवार संजय ब्राह्मणे यांच्या प्रचारार्थ शहरातील रजा टॉवर व कंडारी येथे कॉर्नर सभेचे गुरुवार, 9 मे रोजी आयोजन करण्यात आले आहे.

रजा टॉवर येथे आज रात्री सभा
शहरातील गजबजलेल्या रजा टॉवर भागात गुरुवारी रात्री आठ वाजता संजय ब्राह्मणे यांची कॉर्नर सभा होईल.

कंडारी येथे आज कॉर्नर सभा
भुसावळ तालुक्यातील कंडारी येथे सायंकाळी सात वाजता जेतवन बौद्ध विहारात संजय ब्राह्मणे यांची कॉर्नर सभा होईल.

यांची राहणार उपस्थिती
कॉर्नर सभेला जिल्हाध्यक्ष शमिभा पाटील, युवा जिल्हाध्यक्ष बाळा पवार, महिला जिल्हाध्यक्ष वंदना सोनवणे, जिल्हा महासचिव अ‍ॅड.योगेश तायडे, जिल्हा संघटक बबन कांबळे यांची उपस्थिती राहणार आहे. उपस्थितीचे आवाहन भुसावळ शहराध्यक्ष गणेश जाधव यांनी केले आहे.


कॉपी करू नका.