रावेर लोकसभेतून खासदार रक्षाताईंचा विजय निश्चित !

रावेरात रोड शो दरम्यान खासदार नवनीत राणा : प्रचार रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

0

The victory of MP Rakshatai from Raver Lok Sabha is certain! रावेर : रावेर लोकसभा महायुती व भाजपा उमेदवार खासदार रक्षाताई खडसे यांचा रावेर लोकसभेत विजय निश्चित असल्याचा आशावाद अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी गुरुवारी रावेरात व्यक्त केला. खासदार राणा यांच्यासह मंत्री गिरीष महाजन, जळगाव पूर्व जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांच्या उपस्थितीत रावेरात जोरदार प्रचार रॅली काढण्यात आली. ठिकठिकाणी या रॅलीचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.

रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद
सार्वत्रिक निवडणुक 2024 मध्ये रावेर लोकसभा क्षेत्र भाजपा व महायुतीच्या उमेदवार खासदार रक्षाताई खडसे यांच्या प्रचारार्थ रावेर शहरात गुरुवारी भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, रासप, मनसे ई. मित्र पक्षाच्या वतीने मंत्री प्रचार रॅली काढण्यात आली.

या रॅलीत मंत्री गिरीश महाजन व अमरावती खासदार नवनीत राणा यांचा सहभाग होता. यावेळी त्यांनी मतदारांना अभिवादन करून प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांना सलग तिसर्‍यांदा प्रधानमंत्री बनविण्यासाठी भाजपाला मतदान करण्याचे यावेळी आवाहन केले. यावेळी माजी मंत्र अर्चनादिदी चिटणीस सुद्धा उपस्थित होत्या.


कॉपी करू नका.