भुसावळात दोन गटात दंगल ; रीपाइं जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशींसह 41 जणांविरुद्ध गुन्हा


भुसावळ : रीपाइं जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी यांच्या वाहनावरील काम सोड सांगितल्याचा राग आल्याने दोन गट समोरा-समोर भिडल्याने दोन्ही गटातील दोघे जखमी झाले. शहरातील पंधरा बंगला भागात रविवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास झालेल्या तुफान हाणामारीत ब्लेडसह लोखंडी रॉडचा वापर करण्यात आला. या प्रकरणी राजू सूर्यवंशी यांच्यासह त्यांच्या तिघे बंधू व दोन मुलांसह 19 संशयीतांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला तर दुसर्‍या गटातील प्रकाश निकम यांच्यासह 22 जणांविरुद्ध बाजारपेठ पोलिसात दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी राजू सूर्यवंशी यांना अटक केली असून अन्य आरोपींविरुद्ध अटकेची कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

पहिल्या गटाच्या 22 आरोपींविरुद्ध गुन्हा
पहिल्या गटातर्फे चालक शेख इम्रान शेख गुलाम रसुल (पंधरा बंगला, भुसावळ) यांनी फिर्याद दिली. या तक्रारीवरून संशयीत आरोपी प्रकाश गिरधर निकम, विनोद रामदास निकम, रामदास गिरधर निकम, आकाश प्रकाश निकम, अजय रामदास निकम, संजय रामदास निकम, आनंद पंचमसिंग नरवाडे, सुरेश पंचमसिंग नरवाडे, मनोज अशोक निकम, रोहित सुभाष शेळके, गौरव राजू वाघ, पिंट्या प्रकाश निकम, गोलू प्रकाश निकम, पुष्कराज सुभाष शेळके, सोनु मोहन निकम, शिवा ग्यानसिंग, हर्षल शिंदे, मोहन गिरधर निकम, राजेंद्र पाव्हणु वाघ (सर्व रा.पंधरा बंगला, भुसावळ) यांच्याविरुद्ध दंगलीसह अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. 17 रोजी रात्री साडेनऊ वाजता राजेंद्र आवटे यांच्या दुध डेअरीसमोर फिर्यादी शेख इम्रान हे राजू सूर्यवंशी यांच्या वाहनावर चालक असल्याने हे काम सोडावे, असे आरोपींनी सांगितले मात्र फिर्यादीने त्यास नकार दिल्याचा आरोपींना राग आल्याने त्यांनी लोखंडी रॉड, ब्लेडने हल्ला चढवला. शेख इम्रान यांच्यावर गोदावरी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तपास उपनिरीक्षक दत्तात्रय गुळींग, राजेश किर्तीकर करीत आहेत.

दुसर्‍या गटाच्या 19 जणांविरुद्ध गुन्हा
दुसर्‍या गटातर्फे आनंद पंचमसिंग नरवाडे (पंधरा बंगला, वरणगाव रोड, भुसावळ) यांनी फिर्याद दिल्यावरून रीपाइंचे जिल्हाध्यक्ष राजू भागवत सूर्यवंशी, दीपक भागवत सूर्यवंशी, कैलास भागवत सूर्यवंशी, किशोर भागवत सूर्यवंशी, रोहन राजू सूर्यवंशी, रोहित राजू सूर्यवंशी, शेख इमरान शेख गुलाम रसूल, शेख इमरान याचा भाऊ शाकीर, हबीब शेख अजगर, शेख इमरान याचे वडील शेख हुसेन (पूर्ण नाव माहिती नाही), शेख युसूफ व त्याची दोन्ही मुले (पूर्ण नाव माहिती नाही), विवेक विनोद जावरे , किशोर वानखेडे, शाहरूख शेखे व त्याचे वडील (पूर्ण नाव माहिती नाही), प्रिन्स, शामी, आसीफ, हर्षद सोनार, गौरव कापडणे (पूर्ण नाव माहिती नाही) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सारीका खैरनार करीत आहेत.


कॉपी करू नका.