श्री क्षेत्र मेहूण तापीतीरी संत मुक्ताईंच्या गुप्तदिन सोहळ्यास प्रारंभ


मुक्ताईनगर : श्री क्षेत्र मेहूण तापीतीर येथील श्री संत आदिशक्ती मुक्ताई देवस्थान येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री संत आदिशक्ती मुक्ताई गुप्तदिन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यंदा 728 वा गुप्तदिन सोहळा असून 24 मे पासून सुरू झालेल्या सोहळ्याची सांगता 4 जून रोजी होईल.

विविध धार्मिक कार्यक्रम
सप्ताहात पहाटे काकडा, त्यानंतर श्रीमुक्ताई स्तोत्र व विष्णूसहस्रनाम, सकाळी आठ वाजता ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी तीन वाजता श्रीमद् भागवत कथा, सायंकाळी हरिपाठ व रात्री श्रीहरिकीर्तन होणार आहे. ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व्यासपीठ सुरेश महाराज तळवेल तर श्रीमद् भागवत कथा प्रवक्ते रमेश महाराज सुसरीकर हे आहेत. 7 जून रोजी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे श्रीसंत मुक्ताई पालखीचे प्रस्थान पालखी चालक गजानन महाराज व मंदार महाराज यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे. सप्ताहात ज्ञानदेव महाराज, विजय महाराज, सचिन महाराज, माऊली महाराज, ज्ञानेश्वर महाराज, किशोर महाराज, संदीप महाराज, विष्णू महाराज, माधव महाराज, ज्ञानेश्वर माऊली महाराज, अरूण महाराज, उल्हास महाराज, श्रीराम महाराज यांची कीर्तने होणार आहेत तर सुधाकर महाराज यांचे काल्याचे कीर्तन होईल. भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीसंत मुक्ताई देवस्थानतर्फे करण्यात आले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !