कठोरा खुर्द, बुद्रूक, पिंप्रीसेकमला पाच हेक्टरवरील केळी जमीनदोस्त
5 hectares of banana land in Karda Khurd, Budruk, Pimprisekum भुसावळ : शनिवारी संध्याकाळी झालेल्या वादळी वार्यामुळे तालुक्यातील सुनसगाव शिवारातील शेतात झाड कोसळून त्या खाली एका बैलाचा मृत्यू झाला तर कठोरा खुर्द, कठोरा बुद्रूक, पिंप्रीसेकम येथे 13 शेतकर्यांचे पाच हेक्टरवरील केळी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. केळीची झाडे जमीनदोस्त झाली असून तलाठी व कृषी सहायक यांनी रविवारी सर्व पंचनामे केले.
भुसावळ तालुक्याला वादळाचा फटका
शनिवारी संध्याकाळी वादळी वारे वाहत असताना शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. तालुक्यातील कुर्हे मंडळातील सुनसगाव शिवारात शेतातील पावरी समाजाच्या कुटूंबाचा एक बैल झाड अंगावर पडल्याने मृत्यूमुखी पडला. तलाठी यांनी पंचनामा केला. यावेळी अनेक शेतकरी उपस्थित होते. वादळी वार्यामुळे अनेकांच्या शेतातील झाडांच्या फांद्या तुटून पडल्यात.


13 शेतकर्यांचे केळीचे नुकसान
काही पिकांनाही फटका बसला आहे. कठोरा सज्यात येत असलेल्या कठोरा बुद्रूक, कठोरा खुर्द व पिंप्रीसेकम येथील 13 शेतकर्यांचे केळीच्या पिकाचे नुकसान झाले. रविवारी तलाठी मिलिंद तायडे व कृषी सहायक एस.के.पाटील यांनी दिवसभरात सर्व पंचनामे केले. वादळी वार्यामुळे 13 शेतकर्यांचे केळी पिकांचे नुकसान झाले आहे, केळीची झाडे जमीनदोस्त झाली. या भागात वादळी वाार्याच्या फटक्यात सुमारे 8 ते 10 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. तहसीलदार निता लबडे यांनी तालुक्यातील सर्वच तलाठी यांना त्याच्या कार्यक्षेत्रात काही नुकसान झाले आहे का याची पहाणी व पंचनामे करण्याच्या सूचना केल्या.