भुसावळात पाच वर्षांत हातपंप व कुपनलिकांची दुरुस्ती नाहीच

35 सार्वजनिक विहिरी : 72 हातपंप अनेक वर्षांपासून बंद


In Bhusawal, there is no repair of hand pumps and taps in five years भुसावळ : भुसावळ शहरात गेल्या आठ ते दहा वर्षांपासून दर उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण होते. या टंचाईवर मात करण्यासाठी शहरातील 125 पेक्षा अधिक कुपनलिका व हातपंप तसेच 53 सार्वजनिक विहिरींची मोठी मदत होवू शकते मात्र शहरातील 35 सार्वजनिक विहिरी व 72 हातपंप, कुपनलिका गेल्या सात वर्षांपासून बंद आहे. सध्या शहरात गेल्या पाच वर्षांत कुपनलिका व हातपंप दुरुस्तीचे काम झाले नाही तर गेल्या दहा वर्षांत शहरात खासदार, आमदार, पालिका निधींतून एकही नवीन हातपंप किंवा कुपनलिका निर्माण झाली नाही. यामुळे उन्हाळ्यात टंचाईवर मात करण्याचे व्यापक नियोजनच पालिकेकडे नाही. उन्हाळ्यात टंचाई निर्माण झाल्यावर केवळ टँकरव्दारे पाणीपुरवठा केला जातो मात्र शहराची व्यापी पाहता टँकरची सुविधा फोल ठरते. उन्हाळ्यातील टंचाईवर मात करण्यासाठी पालिकेने अ‍ॅक्शन प्लॅन करणे आवश्यक आहे. मात्र सध्यातरी पालिकेचा क्शन प्लॅन शून्य आहे.

अमृत रखडल्याने विहिरींची गरज
शहराला सध्यस्थितीत पाणीपुरवठा करणारी यंत्रणा जीरर्ण आहे तर दुसरीकडे अमृत योजनेचे काम रखडले आहे. या कारणांमुळे सध्या शहरात हिवाळ्यातही आठ दिवसांआड पाणी मिळते. शहरात गेल्या आठ ते दहा वर्षांपासून दरवर्षी उन्हाळ्यात टंचाई निर्माण होते. उन्हाळा जवळ आला की पाणीपुरवठ्याचे रोटेशन पुन्हा वाढेल. यामुळे शहरात जिवंत जलस्त्रोत असलेल्या विहिरी व कुपनिकांची गरज आहे.



600 ते 800 फुटांवर जलपातळी घसरली
शहरातील श्रीराम नगर, दत्तनगर, हूडको, लक्ष्मी नारायण नगर, श्री हरि नगर, हनुमान नगर, महेश नगर, सानेगुरुजी नगर, महात्मा फुले नगर, विकास कॉलनी, तुकाराम नगर, श्रध्दा कॉलनी, विनायका कॉलनी, गणराया विहार, मुस्लिम कॉलनी, रेणूका माता नगर, मोहित नगर, जळगावरोड हुडको, गणेश कॉलनी, साकेगाव विस्तारीत भाग या भागातील जलपातळी 600 ते 800 फुटांवर गेली आहे. वैयक्तीक कुपनलिका आता आटल्या आहेत.

विस्तारीत भागात विकत टँकर घेण्याची वेळ
शहरातील जामनेर रोडवरील गजानन महाराज मंदिराच्या मागील भाग, तुकाराम नगर, मिरगव्हाण, चोरवड, साकेगाव, खडका, शिवपूर कन्हाळे आदी हद्दीत येणार्‍या शहरातील भागांत पालिकेची पाईप लाईन नाही. या ठिकाणी वैयक्तीक कुपनलिकेतून तहान भागवली जाते मात्र जलपातळी घसरल्याने आतापासून टंचाई निर्माण झाली आहे. 600 ते 800 रुपयांत तीन ते पाच हजार लिटर पाणी विकत घ्यावे लागत आहे. खर्चिक बाब असल्याने दोन ते तीन रहिवासी मिळून एक टँकर पाणी विकत घेत आहेत.

पिण्यासाठी नाही, पण वापरण्यासाठीची गरज भागेल
शहरातील आठ विहिरींची गेल्यावर्षी स्वच्छता करुन पंप टाकण्यात आले. तर सध्या सहा विहिरींची स्वच्छता सुरु आहे. मात्र शहरातील पुर्णपणे आटलेल्या चार ते पाच विहिरी वगळता 35 विहिरींची त्यांचे पाणी वापरता येईल. यासोबत शहरात 125 पेक्षा अधिक कुपनलिका व हातपंप आहेत. यातील सुमारे 40 हातपंप व कुपनलिका सध्या कार्यरत आहे. उर्वरित 72 कुपनलिका व हातपंप नादुरुस्त आहेत. या पाण्याचा वापर पिण्यासाठी नाही पण किमान वापरण्यासाठी होऊ शकेल.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !