भुसावळ तालुक्यात दहावी परीक्षेत मुलींची बाजी : 12 शाळांचा निकाल शंभर टक्के
यंदा निकालाचा टक्का वाढला : विद्यार्थ्यांचा विविध शाखांकडे कल : प्रवेशासाठी लगबग सुरू
In Bhusawal taluka, girls’ victory in class 10th examination : 12 schools’ result is 100 percent भुसावळ : दहावी परीक्षेचा ऑनलाईन निकाल सोमवार, 27 मे रोजी दुपारी एक वाजता बोर्डाच्या संकेत स्थळावर जाहीर करण्यात आला. बारावी परीक्षेप्रमाणेच दहावी परीक्षेतही यंदा सावित्रीच्या लेकीच टॉपर ठरल्या. भुसावळ तालुक्याचा निकाल 95.50 टक्के लागला. चार हजार 389 पैकी चार 189 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. गतवर्षी 2022-2023 मध्ये भुसावळ शहर व तालुक्याचा निकाल 94.90 टक्के तर 2021 मध्ये 99 व 2020 मध्ये 95.82 टक्के होता. भुसावळ तालुक्यातील 55 शाळांपैकी 12 शाळांचा निकाल शंभर टक्के लागला. ऑनलाईन निकाल पाहिल्यानंतर विद्यार्थ्यांनी जल्लोष केला.
म्युन्सीपल हायस्कूल, भुसावळ
भुसावळ :शहरातील नगरपरिषद संचलित म्युन्सीपल हायस्कूलचा निकाल 84.81 टक्के लागला. प्रथम स्वाती संतोष सोनवणे (85.40 टक्के), द्वितीय- गायत्री शिवाजी मतलाने व प्रतिभा अशोक पारधे (75.60 टक्के) व तृतीय आदित्य प्रभाकर माळी (72.60 टक्के) आला. 79 पैकी 67 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यशस्वी विद्यार्थ्यांचे नगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी जितेंद्र पाटील, मुख्याधिकारी महेश वाघमोडे, मुख्याध्यापक ललित फिरके, बिल्डिंग कंडक्टर ज्येष्ठ शिक्षिका सरला सावकारे, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले आहे.


ज्ञानज्योती विद्यालय, खडका
भुसावळ : स्थानिक शिक्षण प्रसारक मंडळ खडकाद्वारा संचालित भुसावळ तालुक्यातील खडका येथील ज्ञानज्योती विद्यालयाचा निकाल 94.62 टक्के लागला. प्रथम- प्रिया संजय पाटील (94 टक्के), द्वितीय -वंशिका कुंदन पाटील (90.40 टक्के), तृतीय- स्नेहा विशाल गावंडे (88.60 टक्के) आली. यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार व सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन शाळेचे चेअरमन प्रमोद भोळे, अध्यक्ष अनिल वारके, उपाध्यक्ष प्रतापसिंग पाटील, सचिव केशव धांडे, संचालक युवराज पाटील, सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापक मोरेश्वर बर्हाटे, माजी मुख्याध्यापक सुनील भिरूड, सर्व शिक्षक, शिक्षकेतर वृंद यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
जी.जे.इंटरनॅशनल स्कूल, वरखेड
बोदवड : बोदवड तालुक्यातील जी.जे.इंटरनॅशनल स्कूल, वरखेड विद्यालयाचा शंभर टक्के निकाल लागला. प्रथम दिव्या सुनील देठे (79.40 टक्के) तर द्वितीय ओम संतोष अत्तरदे (78.80) व तृतीय कृष्णा विनोद पाटील (74.20 टक्के) आला. गुणवंत विद्यार्थ्यांचे शाळेचे चेअरमन जी.जे.राजपुत व सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.
प्रकाश विद्यालय, मोठे वाघोदे
मोठे वाघोदे : प्रकाश विद्यालय व ज्यु.कॉलेजचा दहावीचा निकाल 99.18 टक्के लागला. प्रथम- खुशी गोपाल मानकर (94.40 टक्के) तर दिशा राजेंद्र पवार (93.80 टक्के) द्वितीय व तृतीय क्रमांक व मागासवर्गीयातून प्रथम आयुष हेमंत ठाकरे (93.60 टक्के) आला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष पी.टी.महाजन, उपाध्यक्ष श्रावण सीताराम महाजन, चेअरमन डी.के.महाजन, सचिव किशोर जगन्नाथ पाटील, सहसचिव पी.एल.महाजन व सर्व संचालक मंडळ तसेच मुख्याध्यापक व्ही.एस.महाजन, पर्यवेक्षक आर.पी.बडगुजर व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी अभिनंदन केले आहे.
माध्यमिक विद्यालय, बोदवड
बोदवड : राष्ट्रीय शिक्षण संस्था संचलित, सर सत्यजित राम नेमाडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा निकाल 87.37 टक्के लागला. प्रथम- सोनल प्रमोद माळी (84.40 टक्के), द्वितीय- आर्य चंद्रशेखर कदम (80.60 टक्के) व तृतीय रोहिणी विनोद पाटील (79 टक्के) आली. सर्व विद्यार्थ्यांचे संचालक मंडळ व मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
कै.अमजीत चंदू पाटील हायस्कूल, मनुर बु.॥
बोदवड : श्री संत मुक्ताबाई संस्थान मुक्ताईनगरद्वारा संचलित बोदवड तालुक्यातील मनुर बु.॥ गावातील कै.अमजीत चंदू पाटील हायस्कूलचा निकाल 85.10 टक्के लागला. 47 पैकी 40 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. प्रथम- सुमित निंबाजी रायपूरे (86 टकके), द्वितीय- वैष्णवी सुरेश शेळके (84.60 टक्के) तर तृतीय कामरान भिकारी पटेल (82.40 टक्के) आला.
श्री शिवाजी हायस्कूल, वढोदा
वढोदा, ता.मुक्ताईनगर : वढोदा गावातील श्री शिवाजी हायस्कूलचा निकाल 93.44 टक्के लागला. 61 पैकी 57 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या शाळेत सावित्रीच्या लेकी टॉपर ठरल्या आहेत. प्रथम- अंकिता मनोज तायडे (92 टक्के),
द्वितीय- स्नेहल उमेश न्हावी (91.20 टक्के), तृतीय- साक्षी गौतम मोरे (89.60 टक्के) आली.
कुसुमताई चौधरी विद्यालय, फैजपूर
फैजपूर : कुसुमताई मधुकरराव चौधरी माध्यमिक विद्यालयाचा दहावी परीक्षेचा निकाल 98.42 टक्के लागला. प्रथम प्रणाली किशोर कोष्टी (95.80 टक्के), द्वितीय तन्मय राकेश जैसवाल (93.40 टक्के) व तृतीय संस्कृती संजय उधे (93 टक्के) आली. यशस्वी विद्यार्थ्यांचे बहिणाबाई शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आमदार शिरीष चौधरी, उपाध्यक्ष पंडित कोल्हे, उपाध्यक्ष मोहन महाजन, चेअरमन पी.के.चौधरी, व्हा.चेअरमन पांडुरंग सराफ, सचिव डॉ.उमेश चौधरी, सहसचिव प्रा.विलास बोरोले, सदस्य हिमा चौधरी, सदस्य अशोक पाटील, सदस्य हर्षद गुजराथी, मुख्याध्यापक एस.जे.तळेले व पर्यवेक्षक बी.एम.बोंडे व सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
उमेश्वर माध्यमिक विद्यालय, दसनूर
सिंगनूर, ता.रावेर : येथून जवळच असलेल्या दसनूर (ता.रावेर) येथील उमेश्वर माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा निकाल 90.14 टक्के लागला. विद्यालयातून प्रथम- वैष्णवी नंदू पाटील (95.40 टक्के) तर द्वितीय वेदश्री विशाल पाटील (93.20 टक्के) तर तृतीय स्वरा सदाशीव चौधरी (88 टक्के) आली. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष प्रल्हाद महाजन, उपाध्यक्ष जगन्नाथ महाजन, चेअरमन राजेंद्र महाजन, सचिव दत्तात्रय चौधरी, सर्व संचालक, मुख्याध्यापक एस.जी.महाजन, पर्यवेक्षक आर.एल.तायडे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले आहे.
कमलाबाई अग्रवाल हायस्कूल, रावेर
रावेर : सौ.कमलाबाई एस.अग्रवाल गर्ल्स हायस्कूलचा निकाल 96.45 टक्के लागला. शाळेतून 254 पैकी 245 विद्यार्थीनी उत्तीर्ण झाल्या. मृदुला महेश अत्रे (99.60 टक्के) ही शाळेतून तसेच रावेर केंद्रातून प्रथम आली. द्वितीय हिताशी नंदकुमार सैतवाल (98.80 टक्के), तृतीय प्राची अशोक महाजन व जयिष्णा विनोद पाटील (98.60 टक्के), प्राप्ती प्रशांत पाटील (98.20 टक्के), कृतिका राजेश पाटील (97.80 क्के), देवश्री संदीप सूर्यवंशी (97 टक्के) तर खुषी दिनेश पाटील ही (95.20 टक्के) गुण मिळवून विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाली.
सरदार जी.जी.हायस्कूल, रावेर
रावेर : सरदार जी.जी.हायस्कुल शाळेचा निकाल 94.45 टक्के लागला. शाळेत प्रथम मोहित विजय दडवे (95.20 टक्के), द्वितीय निरंजन विजय पाटील (94.60 टक्के), तृतीय तेजल युवराज महारुद्र मुकेश भरणे (94.40 टक्के) आली. शाळेतून 254 पैकी 240 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. रावेर शिक्षण संवर्धक संघ संचलित सरदार जी.जी.हायस्कूल व कमलाबाई गर्ल्स हायस्कूलमधून यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष प्रकाश मुजूमदार, उपाध्यक्ष अशोक वाणी, चेअरमन डॉ.दत्तप्रसाद दलाल, सरदार जी.जी.हायस्कुलचे मुख्याध्यापक एस.पी.पाटील, गर्ल्स हायस्कूलच्या मुख्याध्यापिका जयश्री कुलकर्णी यांनी अभिनंदन केले.
स्व.अशोक फडके माध्यमिक विद्यालय, कुर्हाकाकोडा
मुक्ताईनगर : मुक्ताईनगर तालुक्यातील कुर्हा येथील स्व.अशोक फडके माध्यमिक विद्यालयाचा निकाल 95 टक्के लागला. कुर्हा केंद्रातून प्रणिता अनंता पाटील (95 टक्के) ही विद्यार्थिनी केंद्रातून व महाविद्यालयातून प्रथम आली.द्वितीय- निखील अनिल सोनवणे (92.60 टक्के), तृतीय सोहम रमेश चौरे (92.40 टक्के) आला. संस्थाध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, संचालक मंडळ व मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
जे.टी.महाजन इंग्लिश मिडियम स्कूल, फैजपूर
फैजपूर : विद्यार्थ्यांना मूल्याधारित व कृतीयुक्त शिक्षण देऊन सुजाण नागरिक घडविण्याच्या उद्देश्याने कार्य करणार्या जे.टी.महाजन इंग्लिश मिडियम स्कूलने दहावीत शभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली. प्रथम- सोनम युवराज बोरोले (98 टक्के), द्वितीय गोपाळ नंदकिशोर अग्रवाल (97 टक्के) व तृतीय फाल्गुनी धनराज बोरनारे (96.80 टक्के) तसेच चतुर्थ खुशबू रवींद्र पाटील (96.40) आली. 55 विद्यार्थ्यांपैकी 31 विद्यार्थ्यांनी 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण पटकावले. 18 विद्यार्थ्यांनी 85 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवले. पाच विद्यार्थ्यांनी 80 टक्क्यांपेक्षा गुण मिळवून यश मिळवले. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष शरद जीवराम महाजन, संस्थेचे उपाध्यक्ष उल्हास निंबा चौधरी, उपाध्यक्ष मार्तंड गणपत भिरूड, सेक्रेटरी विजय रघुनाथ झोपे, जॉ.सेक्रेटरी सोनू गोमा भंगाळे, सर्व संचालक प्रतिनिधी इतर सदस्य व पदाधिकारी यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. विद्यालयाचे इंग्लिश मेडियमचे प्राचार्य मोझेस जाधव, सेमी मेडि. प्राचार्य नंदकिशोर सोनवणे, पर्यवेक्षिका पूनम नेहेते, विद्यालयातील सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले.
धनाजी नाना विद्यालय, सावदा
सावदा : खिरोदा, ता.रावेर येथील धनाजी नाना विद्यालयाचा दहावीचा निकाल 89.84 टक्के लागला. प्रथम लावण्या दिवाकर फेगडे (94.40 टक्के), द्वितीय महेक दीपक तडवी (92.00 टक्के), तृतीय- मोहित दतात्रय साळवे (91.60 टक्के) आला. संस्थाध्यक्ष कुमार चौधरी, आमदार शिरीष चौधरी, संस्थेचे सचिव प्रभात चौधरी, संचालक तुकाराम बोरोले, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मनिषा महाजन, पर्यवेक्षक एस.पी.चौधरी यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. गुणवत्तेची परंपरा कायम ठेवल्याने मुख्याध्यापिका मनिषा महाजन यांनी विद्यार्थ्यांचे कौतूक केले.