मुक्ताईनगरात आज संत मुक्ताबाई प्रक्षाळ पूजा


मुक्ताईनगर : अंतर्धान समाधी सोहळ्यानंतर आईसाहेब मुक्ताईना आलेला थकवा क्षीणभाग घालवण्यासाठी करण्यात येणारी प्रक्षाळ पूजा शुक्रवार, 7 जून रोजी सकाळी 8 वाजेपासून करण्यात येणार आहे. 25 मे ते 4जून पर्यंत संत मुक्ताई अंतर्धान समाधी सोहळा उत्साहात साजरा झाला. हजारो भाविकांनी या अकरा दिवसात दर्शन घेतले.

यात्राकाळात मंदिर 24 तास खुले ठेवण्यात आले. भाविकांच्या दर्शनाने मुक्ताईस आलेला थकवा क्षीणभाग घालवण्याकरिता प्रक्षाळ पूजा करण्याची परंपरा आहे. प्रक्षाळ पूजेचे दोन भाग असतात . उपस्थिताकडून मंदिर गाभारा व परिसर स्वच्छ केला जातो व विविध औषधी काढे तयार करून अभिषेक केला जातो. यावेळी भाविक मुर्तीला साखरलिंबू लावतात. आरतीनंतर पुरणपोळी नैवेद्य दाखवतात. भाविकांनी प्रक्षाळ पूजेस उपस्थित राहून मुक्ताई चरणी सेवा रुजू करावी, असे आवाहन संत मुक्ताई संस्थान मुक्ताईनगर मुळमंदिर समाधीस्थळाहून अध्यक्ष भैय्यासाहेब रवींद्र पाटील यांनी केले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !