सातोदला पाणीपुरवठा कर्मचार्‍याला सर्पदंश : प्रकृती गंभीर


यावल : यावल तालुक्यातील सातोद गावात ग्रामपंचायतीकडून सार्वजनिक पाणीपुरवठा होतो. या पाणीपुरवठ्यासाठी मुख्य जलकुंभात पाणी साठवण करण्यासाठी गुरुवारी रात्री 41 वर्षीय पाणीपुरवठा कर्मचारी शेतात गेला असता व्हॉल्व्ह बदल करत असतांना अचानक त्याच्या उजव्या पायाला सापाने दंश केला. हा प्रकार निदर्शनास येतात त्यास तातडीने ग्रामपंचायत सरपंच व पदाधिकार्‍यांनी त्याला उपचारार्थ यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.त्याची प्रकृती खालवल्याने त्याला तातडीने जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

कर्मचार्‍याची प्रकृती गंभीर
सातोद, ता.यावल या गावात ग्रामपंचायतीकडून ग्रामस्थांना सार्वजनिक पाणीपुरवठा करण्यासाठी जलकुंभात पाणी भरले जात होते. गुरुवारी रात्री शेतात असलेला व्हॉल्व्ह बदलण्याकरिता पाणीपुरवठा कर्मचारी कुर्बान विनायक तडवी (41) हे गेले होते. तेथे गेले असता त्यांच्या डाव्या हाताला अचानक सापाने दंश केला. हा प्रकार निदर्शनास येतात त्यांनी तातडीने ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांना कळवले. सरपंच, उपसरपंच, सदस्य यांनी तातडीने तडवी यांना उपचारार्थ यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. येथे वैद्यकीय अधिकारी डॉ.तुषार सोनवणे, डॉ.सौरव भूताणे, अधिपरीचारिका मंजुषा कोळेकर, कादर तडवी यांनी त्याच्यावर प्रथमोपचार केले. त्याची प्रकृती बिघडल्याने रात्री दीड वाजता त्यास पुढील उपचाराकरिता जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले असून त्याची प्रकृती सध्या गंभीर आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !