श्री संत मुक्ताई पालखीचे पंढरपूर प्रस्थान


मुक्ताईनगर : आदिशक्ती श्री संत मुक्ताबाईची आषाढी वारीसाठीची पालखी मंगळवारी हजारो भाविकांच्या सहभागातून मुक्ताईनगर येथून पंढरपूरकडे रवाना झाली. याप्रसंगी राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील, मुक्ताबाई संस्थानचे अध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पाटील उपस्थित होते.

मुक्ताई पर्यटन क्षेत्रास निधी देणार : गिरीश महाजन
मंगळवारी सकाळी चापोरा येथील उदय पवार (मध्यप्रदेश) यांच्याहस्ते पूजा करण्यात आली. याप्रसंगी मंत्री गिरीश महाजन यांनी मुक्ताबाई पर्यटन क्षेत्रासाठी या अपूर्ण निधी लवकरच देण्याची घोषणा केली. आमदार चंद्रकांत पाटील व मुक्ताबाई संस्थानचे अध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पाटील यांनी देखील आपले मनोगत याप्रसंगी व्यक्त केले. दुपारी एक वाजेच्या सुमारास पालखी ही मुक्ताईनगर शहराकडून नवीन मुक्ताबाई मंदिराकडे मार्गस्थ करण्यात आली. अग्रभागी हातात भगव्या पताका घेऊन व नृत्य करत वारकरी दोन0दोनच्या रांगेत ही पालखी पुढे मार्गस्थ झाले. महिला वारकर्‍यांची संख्यादेखील लक्षणीय होती. जवळपास 100 दिंड्या पालखी रवाना सोहळ्यात सहभागी झाल्या. हजारो वारकर्‍यांनी याप्रसंगी पंढरपूरला आषाढी वारीसाठी पायी जात असल्याचे बोलून दाखवले. शहरात विविध ठिकाणी रांगोळ्या काढून पालखीचे स्वागत करण्यात आले.



मुक्ताई पालखीचे सर्वत्र स्वागत
मंगळवारी दुपारी एक वाजता निघालेली पालखी ही जवळपास चार वाजेच्या सुमारास नवीन मुक्ताबाई मंदिरात पोहोचली. तत्पूर्वी मुक्ताईनगर शहरात विविध ठिकाणी भाविकांकडून चहा, फराळ व पाण्याचे वाटप करण्या आले. टाळ मृदुंगाच्या गजरात संपूर्ण शहरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !