बालकांच्या न्याय हक्कास सर्वोच्च प्राधान्य द्या : अ‍ॅड..अर्जुन पाटील 


बोदवड : बोदवड विधी सेवा प्राधिकरण व बोदवड न्यायालय यांच्या संयुक्त विद्यमानाने बोदवड येथिल दिवाणी व फौजदारी न्यायालयात जागतिक बालकामगार निषेध दिनानिमित्त कार्यक्रम झाला. बोदवड तालुका वकील संघ अध्यक्ष अ‍ॅड.अर्जुन पाटील म्हणाले की, दरवर्षी 12 जून हा दिवस जगभरात बालमजुरी विरुद्ध जागतिक दिवस म्हणून साजरा केला जातो. बालमजुरी रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने 19 वर्षांपूर्वी याची सुरुवात केली होती. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश लहान मुलांना मजुरी न करता त्यांना शिक्षण आणि त्यांचा पाठपुरावा करण्यासाठी जागरूक करणे हा आहे. सरकार, मालक आणि कामगार संघटना तसेच जगभरातील लाखो लोकांना बालमजुरी थांबवण्यासाठी दरवर्षी जागरूक केले जाते, त्यानंतर त्यांची संख्या वाढत आहे. मुलांच्या मदतीसाठी अनेक मोहिमाही राबवल्या जातात. अशी अनेक मुलं आहेत जी अगदी लहान वयातच आपलं बालपण गमावून बसतात. बालमजुरी बंद करून बालकांच्या न्याय हक्कास प्राधान्य द्या, असेही ते म्हणाले.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष न्यायाधिश क्यु.यु.एन शरवरी उपस्थित होते. बालकामगार यांच्यासाठी यशस्वी लढा देणारे रामेश्वर लोहार यांनी याबाबत आपले विचार मांडले. सचिव अ‍ॅड.धनराज सी. प्रजापती, अ‍ॅड.के.एस इंगळे, अ‍ॅड.किशोर महाजन, अ‍ॅड.सी.के.पाटील यांनी अभ्यासपुर्ण मार्गदर्शन केले. कार्यक्रमास विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष योगेश पाटील उपस्थित होते. आभार अ‍ॅड.धनराज सी.प्रजापती यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी बोदवड तालुका वकील संघ व न्यालयीन कर्मचारी आर.पी.साबळे, ए.जे.राठोड, आर.पी.इंगळे, ए.पी. सुर्यवंशी, संतोष पाटील आदींनी परीश्रम घेतले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !