सिकंदराबाद विभागात तिसर्या लाईनीसाठी ब्लॉक : चार गाड्यांचे मार्ग बदल
पुणे काझीपेठ-पुणे गाडी रद्द : रेल्वे प्रवाशांची पुन्हा होणार गैरसोय
भुसावळ : दक्षिण मध्य रेल्वेच्या सिकंदराबाद विभागातील काझीपेठ-बल्लारशाह विभागातील आसीफाबाद रोड आणि रेहचानी रोड स्थानकांदरम्यान तिसर्या रेल्वे लाईनीचे काम सुरू करण्यासाठी प्री-नॉन-इंटरलॉकिंग आणि नॉन-इंटरलॉकिंग कामासाठी ट्रॅफिक, पॉवर ब्लॉक घेण्यात येत आहे. यामुळे भुसावळ विभागातून धावणार्या दोन गाड्या रद्द करण्यात आल्या आहेतत तर चार गाड्यांचे मार्ग बदल करण्यात आले आहे.
28 व 5 रोजी काजीपेठ एक्स्प्रेस रद्द
पुणे-काजीपेठ एक्सप्रेस ही गाडी दि. 28 जून व 5 जुलैला रद्द करण्यात आली असून काजीपेठ-पुणे एक्स्प्रेस ही गाडी सुध्दा 30 जून व 7 जुलैला रद्द करण्यात आली आहे तसेच चार रेल्वे गाड्यांच्या मार्गात बदल केला आहे. यामुळे या गाड्या अन्य मार्गाने धावणार आहे. यामुळे प्रवाशांची गैरसोय होणार आहे. मार्गात बदल केलेल्या गाड्यांमध्ये ओखा-पुरी एक्स्प्रेस ही गाडी 26 जून व 3 जुलै या दिवशी वर्धा-नागपूर-रायपूर-तिटीलागढ-रायगड-विजियानगरम-खुर्दा रोड मार्गे वळवली जाईल. ही गाडी चंद्रपूर-बल्हारशाह-सिरपूर कागजनगर-मंचिरयाल-रामागुंडम-वारंगल-विजयवाडा-एलुरु-राजमुंद्री-समलकोट-अनाकपल्ले-विशाखापट्टणम स्थानकांवरुन जाणार नाही. तसेच पुरी-ओखा एक्स्प्रेस ही गाडी 30 जून या दिवशी खुर्द रोड-विजियानगरम-रायगड-तिटीलागढ-रायपूर-नागपूर-वर्धा मार्गे वळवली जाईल. ही गाडी विशाखापट्टणम-अनकपल्ले-समलकोट-राजमुंद्री-एलुरु-विजयवाडा-वारंगल-रामागुंडम-मंचिरयाल-सिरपूरकागजनगर-बल्हारशाह-चंद्रपूर स्थानकांवर जाणार नाही. विशाखापट्टणम-गांधीधाम एक्सप्रेस ही गाडी 27 जून व 4 जुलै या दिवशी विशाखापट्टणम-विजियानगरम-रायगड-तिटीलागड-रायपूर-नागपूर-वर्धा मार्गे वळवली आहे. ही गाडी समलकोट-राजमुंद्री-एलुरु-विजयवाडा-वारंगल-रामागुंडम-मंचिरयाल-सिरपूरकागजनगर-बल्हारशाह-चंद्रपूर स्टेशनवर जाणार नाही. गांधीधाम-विशाखापट्टणम एक्सप्रेस ही गाडी 30 जून या दिवशी वर्धा-नागपूर-रायपूर-तिटीलागढ-रायगढ-विशाखापट्टणम-विशाखापट्टणममार्गे वळवली आहे. ही गाडी चंद्रपूर-बल्हारशाह-सिरपूर कागजनगर-मंचिरयाल-रामागुंडम-वारंगल-विजयवाडा-एलुरु-राजमुंद्री-समलकोट स्थानकांवर जाणार नाही. प्रवाशांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

