निमगाव येथे 27 वर्षीय तरुणास सर्पदंश


A 27-year-old youth was bitten by a snake in Nimgaon यावल : यावल तालुक्यातील निमगाव येथे 27 वर्षीय तरुण घराच्या बांधकामाचे सेंट्रींग ठोकत असताना लाकडी पाटी उचलतांना त्यांच्या हाताला सापाने दंश केला. हा प्रकार निर्दशनास येताच त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर आहे.

तरुणाची प्रकृती धोक्याबाहेर
निमगाव येथे दीपक तायडे यांच्या घराचे बांधकाम सुरू आहे. त्यांच्या बांधकामावर रविवारी सेंट्रींग ठोकण्याचे काम प्रवीण शांताराम सोनवणे (27, रा.निमगाव) हा तरुण करीत असताना लाकडी पाटी उचलत असतांना त्यांच्या उजव्या हाताला सापाने दंश केला. हा प्रकार निदर्शनास येतच तरुणाला यावल ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरीता दाखल करण्यात आले. वैद्यकिय अधिकारी डॉ.प्रशांत प्रशांत जावळे, अधिपरिचारीका आरती कोल्हे, पिंटू बागुल आदींनी उपचार केले. तरुणाची प्रकृती स्थिर असून त्याची प्रकृती धोक्याबाहेर आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !