भुसावळातील दे.ना.भोळे महाविद्यालयात जागतिक योग दिवस उत्साहात


भुसावळ : भुसावळ शहरातील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात जागतिक योग दिनानिमित्त योग वेलनेस सेंटर अंतर्गत योग प्राणायाम आणि ध्यान कार्यक्रम आयोजित करण्यात आला. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.पी.फालक होते.

विविध योगासनांचा सराव
प्राचार्य डॉ.आर.पी.फालक यांनी जागतिक योग दिवसाची पार्श्वभूमी स्पष्ट करून योग आणि प्राणायामाचे जीवनातील महत्व सांगितले. महाविद्यालयाच्या भौतीकशास्त्र विभाग प्रमुख आणि योग शिक्षक प्रा.डॉ.दयाघन राणे यांनी योगाभ्यासमधील पूरक हालचाली, बैठक स्थिती, दंड स्थिती, विपरीत शयन स्थिती आणि शयन स्थिती मधील विविध योगासने यांचा सराव उपस्थितांकडून करवून घेतला. प्रास्ताविक महाविद्यालयाचे योग वेलनेस सेंटर चे सचिव व क्रीडा संचालक प्रा.डॉ.संजय चौधरी यांनी केले. प्रसंगी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !