निरोगी आयुष्यासाठी व्यसनांपासून रहा : भुसावळात प्राचार्य आर.पी.फालक


भुसावळ : अंमली पदार्थांच्या सेवनाने आर्थिक सामाजिक आणि कौटुंबिक नुकसान होते त्यामुळे सर्वांनीच व्यसनापासून दूर रहावे शिवाय निरोगी आयुष्यासाठी व्यसनांपासून दूर रहावे, असे आवाहन प्राचार्य आर.पी.फालक यांनी केले. शहरातील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात जागतिक अंमली पदार्थ सेवन विरोधी दिवसाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. सामाजिक न्याय आयुक्तालय महाराष्ट्र राज्य यांच्या अधिनस्त असणार्‍या नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्याचे जळगाव जिल्हा संघटक प्रा.डॉ.दयाघन एस.राणे हे प्रमुख वक्ते होते.

व्यसनी व्यक्तींपासून चार हात लांब रहा : प्रा.राणे
प्रा.डॉ.राणे यांनी उपस्थितांना अंमली पदार्थांचे विविध प्रकार, त्यांच्या सेवनानंतर शरीरावर कसे परिणाम होतात हे सांगून व्यसन लागण्याची कारणे स्पष्ट केलीत. आपल्याला व्यसनापासून दूर राहायचे असेल तर आपण व्यसनी व्यक्ती ज्या ठिकाणी असतात त्या ठिकाणाहून ही लांब असायला पाहिजे. समृद्ध आणि निरामय जीवनासाठी सर्वांनी व्यसनमुक्त राहावे, असे आवाहन प्रा.डॉ.दयाघन राणे यांनी केले केले. प्रसंगी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.आर.बी.ढाके, प्रा.डॉ.जे.बी.चव्हाण, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.आर.डी.भोळे, क्रीडा संचालक प्रा.डॉ.संजय चौधरी व कर्मचारी उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !