भुसावळातील भोळे महाविद्यालयात छत्रपती राजश्री शाहू महाराज जयंती साजरी
भुसावळ : शहरातील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात बुधवार, 26 रोजी छत्रपती राजश्री शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आले. प्रतिमेचे पूजन प्राचार्य डॉ.आर.पीफालक यांनी केले.
यांची कार्यक्रमास उपस्थिती
कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे करण्यात आले. कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.आर.बी.ढाके, राष्ट्रीय सेवा योजनेचे सहाय्यक कार्यक्रमाधिकारी डॉ.जगदीश चव्हाण, महिला कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ.माधुरी पाटील, प्रा.श्रेया चौधरी, प्रा.संजय पाटील, डॉ.डी.एस.राणे, डॉ.गोविंदा वाघुळदे, प्रा.दीपक कुमार जैस्वर उपस्थित होते तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे विभागाचे विद्यार्थी उपस्थित असल्याचे प्रसिद्धी प्रमुख डॉ.संजय चौधरी कळवितात.

श्री.र.न.मेहता हिंदी विद्यामंदिर
भुसावळ : शहरातील श्री.र.न.मेहता हिंदी प्राथमिक विद्यामंदिरात राजश्री शाहू महाराज यांचा जन्मदिन तसेच सामाजिक न्याय दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी राजश्री शाहू महाराज यांच्या कार्याविषयी माहिती सांगितली. सामाजिक न्याय दिनाचे महत्त्व शिक्षकांनी सांगितले. याप्रसंगी कला व विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी रीता शर्मा मॅडम यांनी अनमोल मार्गदर्शन केले. शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.