अंजाळे येथे वृद्धाला दोघांची मारहाण : दोघांविरोधात गुन्हा
Elderly man beaten up by two in Anjale : Crime against both यावल : यावल तालुक्यातील अंजाळे या गावात रस्त्यातून बाजूला व्हा अशा बोलण्याच्या रागातून दोघांनी एका 71 वर्षीय वृद्धाला शिवीगाळ करून लाकडी काठीने डोक्यात मारून दुखापत केली. ही घटना मंगळवारी दुपारी घडली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात शनिवारी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
दोघांविरोधात गुन्हा दाखल
अंजाळे, ता.यावल या गावात पंडित काशीनाथ कोळी (71) वर्ष हे मंगळवारी दुपारी बी-बियाणे घेण्यासाठी कृषी केंद्रावर जात असताना रत्यात उभ्या असलेल्या मधुकर सोना सपकाळे व तुषार मधुकर सपकाळे (दोघे रा.अंजाळे, ता.यावल) यांना ते बोलले की, मला पुढे जायचे आहे तुम्ही रस्त्यातून बाजूला व्हा, या बोलण्याच्या रागातून या 71 वर्षीय वृद्धाला दोघांनी शिवीगाळ करून मारहाण केली आणि लाकडी काठीने मारून दुखापत केली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दोन जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन चव्हाण करीत आहे.

