भुसावळ शहरातील हेमंत पैठणकर तलवारीसह जाळ्यात


भुसावळ : शहरातील दिनदयाल नगर भागातून हेमंत जगदीश पैठणकर (29, तुकाराम नगर, शिवपूर कन्हाळा रोड, भुसावळ) यास तलवार बाळगून दशहत निर्माण करताना बाजारपेठ पोलिसांनी अटक केली. ही कारवाई शुक्रवार, 28 रोजी मध्यरात्री दिड वाजता करण्यात आली.

गोपनीय माहितीवरून कारवाई
भुसावळ बाजारपेठ पोलीस निरीक्षक गजानन पडघन यांना संशयीत दिनदयाल नगर भागात तलवार बाळगून दहशत निर्माण करीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला कारवाईचे निर्देश दिले. पोलीस कर्मचारी उमाकांत पाटील यांनी संशयीतास शुक्रवारी मध्यरात्री ताब्यात घेत त्याच्याकडील पाचशे रुपये किंमतीची धारदार तलवार जप्त केली. कॉन्स्टेबल प्रशांत सोनार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलीस स्टेशनला संशयीताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार उमाकांत पाटील करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !