यावलला सायकलीवरून पडल्याने 47 वर्षीय इसमाचा मृत्यू
यावल : शहरातील पूर्णवाद नगरातील रहिवासी सायकलद्वारे शहरात जात असताना बस स्थानकाजवळ चक्कर येऊन तो कोसळल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी रात्री घडली. डाबीर जयराम साहू (47) असे मयताचे नाव आहे. साहू हे रविवारी रात्री सायकलद्वारे यावल शहरात येत असताना बस स्थानकाजवळ त्यांना चक्कर आले व ते जमिनीवर कोसळले.
नागरिकांनी त्याला तातडीने रुग्णालयात नेल्यानंतर डॉ.तुषार सोनवणे यांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात मुमकली साहू हिने दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास सहा.पोलीस निरीक्षक हरीष भोये यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक वसीम तडवी करीत आहे.

