भुसावळ इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ रेलसिटी अध्यक्षपदी मीनाक्षी धांडे
भुसावळ : भुसावळ शहरातील इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ रेलसिटीच्या अध्यक्षपदी मीनाक्षी नितीन धांडे यांची निवड करण्यात आली. सन 2024 ते 2025 या वर्षासाठी त्या पदभार सांभाळतील. अन्य कार्यकारणीत सचिवपदी किरण सुनील जावळे यांची निवड करण्यात आली. मावळत्या अध्यक्ष रेवती मांडे व मावळत्या सचिव सीमा सोनार यांच्याकडून रविवार, 7 जुलै पदग्रहण समारंभात नूतन अध्यक्ष व सचिव पदभार स्वीकारतील.
कार्यक्रमास यांची राहणार उपस्थिती
केंद्रीय राज्य मंत्री रक्षा खडसे, भुसावळ तहसीलदार नीता लबडे, माजी डिस्ट्रिक्ट चेअरमन मीनल लाठी, प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे यांच्या उपस्थितीत शहरातील प्रभाकर हॉलमध्ये 7 जुलै रोजी सायंकाळी सहा वाजता पदग्रहण समारंभ होणार आहे.
