सांगवीतील विवाहितेचा दोघांनी केला छळ


यावल : यावल तालुक्यातील सांगवी बुद्रुक येथील माहेर असलेल्या एका 20 वर्षीय विवाहितेचा पती व सासरे दोघांनी छळ केला. विवाहितेला शिवीगाळ करून पतीने दारूच्या नशेत मारहाण करीत उपाशीपोटी ठेवून घराच्या बाहेर हाकलून दिले. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात विवाहितेच्या फिर्यादीवरून बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला.

सांगवी बुद्रुक, ता.यावल या गावातील माहेर असलेल्या पल्लवी योगेश चौधरी (20) या विवाहितेने यावल पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार तिचा विवाह 15 जून 2022 रोजी योगेश किशोर चौधरी (मंगलमूर्ती पार्क, विश्राम नगर, वेड रोड सुरत, गुजरात) यांच्याशी झाला होता. विवाहानंतर पतीने दारूच्या नशेत सतत विवाहितेला शिविगाळ करणे मारहाण करणे जेवण न देणे असा छळ सुरू केला. पती योगेश चौधरी आणि सासरे किशोर चौधरी दोघांनीही विवाहितेला त्रास देऊन रात्री घराच्या हाकलून दिले. विवाहितेच्या फिर्यादीवरून पती व सासरे दोघांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक किशोर परदेशी करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !