सोशल मिडीयावर भुसावळातील तरुणीचा फोटो टाकून विनयभंग
भुसावळ : शहरातील रींग रोडवरील एका कॉलनीतील रहिवासी असलेल्या 21 वर्षीय तरुणीचा सोशल मिडीयावर फोटो टाकून तरुणीची बदनामी करीत विनयभंग करण्यात आला. ही घटना बुधवार, 3 जुलै रोजी 12.30 वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी नदीम शेख (पटेल कॉलनी, भुसावळ) याच्याविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली.
संशयीताला पोलिसांकडून अटक
शहरातील रिंग रोडवरील एका कॉलनीत 21 वर्षीय तरुणी वास्तव्यास आहे. आरोपी नदीम शेख याने पीडीतेसोबतचा काढलेला फोटो एकाला पाठवून तरुणीची बदनामी केली तसेच मोबाईलवरून तरुणीचा पाठलाग करीत तिचा विनयभंग केला. याप्रकरणी तरुणीच्या फिर्यादीवरून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली. तपास सहाय्यक निरीक्षक किशोर पवार करीत आहेत.

