भुसावळ तालुक्यातील अल्पवयीन बालिकेचा विनयभंग : स्कूल व्हॅन चालकाला अटक
भुसावळ : भुसावळ तालुक्यातील एका गावातून नर्सरीत शिक्षणासाठी येणार्या अवघ्या साडेतीन वर्षीय बालिकेचा व्हॅन चालकाने विनयभंग केल्याची संतापजनक घटना 1 व 2 जुलै रोजी समोर आली आहे. याप्रकरणी संशयीत प्रसाद हिरासिंग चौधरी (भुसावळ तालुका) याच्याविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली. संशयीताला न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
आरोपीविरोधात पोस्कोन्वये गुन्हा
ग्रामीण भागातील एका गावातील साडेतीन वर्षीय बालिका नर्सरीत असून ती दररोज संशयीताच्या व्हॅनमधून प्रवास करीत होती मात्र 1 व 2 जुलै रोजी आरोपीने पीडीतेला मानसिक व शारीरीक त्रास होईल, असे कृत्य करीत तिचा विनयभंग केला. पीडीतेने घडलेला प्रसंग कुटूंबाला सांगितल्यानंतर पीडीतेच्या आईने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. आरोपी प्रसाद चौधरीविरोधात अॅट्रासिटी व पोस्कोन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला अटक करण्यात आली आहे. तपास पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे करीत आहेत.

