नोकरीच्या आमिषाने भुसावळातील तरुणाला दहा लाखांचा गंडा : नाशिकच्या चौकडीविरोधात गुन्हा


भुसावळ  : हिंदूस्थान एरोनॉटीक्स कंपनीत नोकरी लावून देण्याच्या आमिषाने भुसावळातील तक्रारदाराला दहा लाखांचा गंडा घालण्यात आला. याप्रकरणी नाशिकच्या चौकडीविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

असे आहे फसवणूक प्रकरण
रवींद्र सोनार अडकमोल (55, प्लॉट नंबर 27, सरस्वती नगर, भुसावळ) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा मुलगा आशिष याला ओझर टाऊनशीप येथील हिंदूस्थान एरोनॉटीक्स कंपनीत नोकरी लावून देण्याच्या आमिषाने भामट्यांनी 10 ते 24 डिसेंबर 2022 दरम्यान फोन पे द्वारे दहा लाख रुपये स्वीकारले मात्र मुलाला नोकरी लागली नाही. या संदर्भात विचारणा केल्यानंतरही समाधानकानक उत्तर देण्यात आले नाही व पैसेदेखील परत करण्यात न आल्याने फसवणूक झाल्याची खात्री झाल्यानंतर अडकमोल यांनी बाजारपेठ पोलिसात धाव घेतली. याप्रकरणी संशयीत आरोपी सुनील विश्वासराव पाटील (55, हुडको कॉलनी, फकिरा सिंध नगर, नंदुरबार), मनीषा उर्फ हर्षदा प्रदीप पवार (पाटील) व जयेश राजेंद्र पाटील, प्रदीप यशवंत पवार (सर्व रा.निवृत्ती प्रभा अपार्टमेंट, वी विंग, प्लॅट नंबर 15, सेकंड प्लोअर, पौर्णिमा स्वीट जवळ, वावरे नगर, नाशिक) यांच्याविरोधात बााजरपेठ पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !