भुसावळात 88 हजारांचा गुटखा जप्त : अन्न व औषध प्रशासनाची कारवाई


Gutkha worth 88 thousand seized in Bhusawal: Food and Drug Administration action
भुसावळ :
शहरातील तुलसीदास महाराज कॉम्प्लेक्समधील मे.ओम साई ट्रेडर्स या दुकानात अन्न व औषध प्रशासनाने छापेमारी करीत 88 हजार 445 रुपयांची सुगंधी सुपारी, सिगनेचर पान मसाला, पान पराग, बाबा सुगंधी तंबाखू असा सुमारे 88 हजार 445 रुपयांचा माल जप्त केला. ही कारवाई शुक्रवार, 5 जुलै रोजी संध्याकाळी करण्यात आली. या कारवाईने अवैधरीत्या गुटखा विक्री करणार्‍यांच्या गोटात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

गोपनीय माहितीवरून कारवाई
मे.ओम साई ट्रेडर्स शॉप नं. 30 या दुकानातून विजयसिंग प्रल्हादसिंग पाटील (रा. म्हाडा कॉलनी, भुसावळ) याने प्रतिबंधीत गुटख्याचा साठा केल्याची माहिती मिळाल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी छापा टाकून सिगनेचर पान मसाला, रजनीगंधा पान मसाला, पान पराग पान मसाला, बाबा सुगंधीत तंबाखू असा एकूण 88 हजार 445 रुपयांचा माल जप्त केला आहे. याप्रकरणी येथील बाजारपेठ पोलिसात अन्न सुरक्षा अधिकारी शरद पवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार विजयसिंग पाटील याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोिीस उपनिरीक्षक मंगेश बेंडकोळी करीत आहेत.

अन्य विक्रेत्यांवर कारवाई कधी ?
शहरातील किराणा दुकानांसह पानटपर्‍यांवर खुलेआमपणे गुटख्याची विक्री होत आहे तर गुटखा माफियांची मोठी टोळी शहरात कार्यरत असताना त्यांच्यावर कारवाई करण्याचे धाडस अन्न औषध प्रशासन व गुन्हे शाखा व पोलीस प्रशासन दाखवणार का? असा प्रश्न सर्वसामान्य जनता उपस्थित करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !