स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने चाळीसगावच्या तरुणीला 21 लाखांचा गंडा
Chalisgaon girl extorted 21 lakhs by luring her to invest in the stock market चाळीसगाव : शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतविल्यास अधिक नफा मिळेल, असे आमिष दाखवत चाळीसगावातील उच्च शिक्षीत 20 वर्षीय तरुणीला भामट्यांनी 21 लाख सात हजार 456 रुपयांचा गंडा घातला. जळगाव सायबर पोलीस ठाण्यात भामट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
असे आहे फसवणूक प्रकरण
चाळीसगाव तालुक्यातील एका गावातील रहिवासी व हल्ली चाळीसगावात राहणार्या 20 वर्षीय तरुणीला 17 मे 2024 ते 7 जुलै 2024 दरम्यान साक्षी सिंग नावाच्या महिलेने टेलिग्राम अकाउंटवर इंडस्टोक नावाने लिंक पाठवून तसेच व्हॉट्सअॅपवर मोतीलाल ओसवाल ग्रुप क्यू 5 या ग्रुपला जॉईन करून व्हॉट्सअॅपच्या मोबाईल क्रमांक 919662247794 यावरून बँक खात्याची माहिती पाठविण्यात आली तसेच यात शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतविल्यास अधिक नफा होईल, असे आमिष दाखविण्यात आले.


भामट्यांच्या बोलवण्यावर विश्वास ठेवून तरुणने ऑनलाईन 21 लाख सात हजार 456 रुपये पाठवले. लाभ मिळत नसल्याने व प्रतिसाद मिळत नसल्याने आपली फसवणूक झाल्याची खात्री होताच तरुणीने जळगावच्या सायबर पोलीस ठाण्यात साक्षी सिंग आणि इतरांविरोधात गुन्हा दाखल केला. तपास पोलीस निरीक्षक एम.एम.कासार करीत आहे.