30 हजारांची लाच भोवली : नाशिक मध्यवर्ती कारागृहाचे दोघे डॉक्टर एसीबीच्या जाळ्यात


30 thousand bribe : Two doctors of Nashik Central Jail in ACB’s net नाशिक : फिटनेस सर्टिफिकेट देण्यासाठी तडजोडीअंती 30 हजारांची लाच स्वीकारताना नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहाचे मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ.आबीद आबू अतार (40) व वैद्यकिय अधिकारी डॉ.प्रशांत एकनाथ खैरनार (42) यांना नाशिक एसीबीने अटक केली. या कारवाईने लाचखोर हादरले आहेत.

लाच स्वीकारताच अटक
35 वर्षीय तक्रारदार यांचे मित्र हे मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहेत. शासकिय नियमाप्रमाणे ज्या बंदी कैदीचे वय 65 वर्षांपेक्षा जास्त आहे तसेच ज्या कैदीने 14 वर्ष शिक्षा भोगली आहे, अशा कैदांना शासनाने नेमून दिलेली समिती सोडून देते. परंतु अशा कैदांना बाहेर सोडण्याकरीता मुख्य वैद्यकिय अधिकारी यांचे फिटफॉर सर्टिफिकेटची गरज असते. या सर्टिफिकेटसाठी मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ.आबीद आबू अतार व वैद्यकिय अधिकारी डॉ.प्रशांत एकनाथ खैरनार यांनी तक्रारदाराच्या मित्राकडे 40 हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर 30 हजार देण्याचे ठरल्यानंतर तक्रार नोंदवल्यानंतर सापळा रचण्यात आला. लाच स्वीकारताच दोघांना अटक करण्यात आली.

यांनी केला सापळा यशस्वी
नाशिक एसीबीचे पोलीस निरीक्षक स्वप्नील राजपूत, पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप, प्रभाकर गवळी, प्रफूल्ल माळी, संतोष गांगुर्डे, किरण धुळे आदींच्या पथकाने सापळा यशस्वी केला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !