रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा : ‘या’ रेल्वे गाड्यांच्या जनरल डब्यात वाढ


भुसावळ : रेल्वे गाड्यांना होत असलेली प्रवाशांची गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाकडून नांदेडकडून भुसावळकडे येणार्‍या पाच रेल्वे गाड्यांना जनरल डब्यांची संख्या वाढविण्यात आल्याने प्रवाशांची मोठी सोय झाली आहे पाचही गाड्यांना प्रत्येकी दोन जनरल डबे अधिकचे लावण्यात आल्याने वेळेवर प्रवास करणार्‍या प्रवाशांचा जागेचा प्रश्न मिटणार आहे.

प्रवाशांना मोठा दिलासा
नांदेड विभागातून भुसावळकडे येणार्‍या रेल्वे गाड्यांच्या प्रवासी डब्यांच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे. यात प्रत्येक गाडीला दोन जनरल डबे वाढविण्यात आले आहे. यात नांदेड अमृतसर-सचखंड एक्स्प्रेस, हैद्राबाद-जयपूर एक्स्प्रेस, हैद्राबाद-हिसार एक्स्प्रेस तसेच भुसावळ कॉर्ड लाईनीवरून जाणार्‍या नांदेड-अब अमदौरा एक्स्प्रेस व नांदेड-श्री गंगानगर एक्स्प्रेस या गाड्यांच्या जनरल डब्याच्या संख्येत प्रत्येकी दोनने वाढ केली आहे. यामुळे या गाड्यांना आता चार जनरल डबे राहणार असल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !