ट्रॅक्टर चोरटा जळगाव एलसीबीच्या जाळ्यात
जळगाव : जळगाव एलसीबीने ट्रॅक्टर चोरटा रमेश उर्फ अनिल काशिनाथ सोनवणे (32, रा. सावखेडा बुद्रुक) याला अटक केली असून जंगलात लपवून ठेवलेला ट्रॅक्टरही जप्त केला आहे. जळगाव तालुक्यातील सावखेडा गावातून 7 मार्च ते 8 मार्च दरम्यान चोरट्याने ट्रॅक्टर (क्र. एम.एच.19 ए.पी.5076) लांबवला होता. या प्रकरणी 11 जुलै रोजी तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक राहुल तायडे, गणेश वाघमारे, जितेंद्र पाटील, नितीन बाविस्कर, बबन पाटील, भारत पाटील, ईश्वर पाटील यांनी केली.