जळगावात भरधाव कारने पाच महिलांसह दोन चिमुकल्यांना उडवले : महिलेचा मृत्यू

जमावाकडून चालकाला जागेवरच चोपले : एमआयडीसी पोलिसात गुन्हा


Speeding car hits five women and two toddlers in Jalgaon: Woman dies जळगाव : जळगावातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. नवीन वाहन चालवण्याचा प्रयत्न करणार्‍या चालकाने भरधाव वेगाने वाहन चालवत पाच महिलांसह दोन चिमुकल्यांना धडक दिल्याने एका महिलेचा मृत्यू ओढवला हा हा अपघात गुरुवार, 18 रोजी सायंकाळी साडेसहा वाजता घडली. एमआयडीसी पोलीस स्टेशनला अपघाताची नोंद करण्यात आली असून अपघातानंतर जमावाने कार चालकाला जागेवरच चोपून काढले. या अपघातात शोभा रमेश पाटील (60, रा.साईप्रसाद कॉलनी, मंगलपूरी, मेहरुन) यांचा मृत्यू झाला.

पाच महिलांना उडवले
कार चालक पवन कैलास पाटील (25, रा.सप्तशृंगी कॉलनी, रामेश्वर कॉलनी मेहरुण, जळगाव) याने आपल्या ताब्यातील कार (एम.एच.05 ए.एस 0574) ही जळगावाच्या मेहरुण परिसरात अत्यंत अरुंद रस्ता असलेल्या मंगलपुरी भागात गुरुवारी सायंकाळी भरधाव वेगाने चालवली व याचवेळी रस्त्यावर महिला उभ्या असताना त्यांना कारची धडक बसली तसेच दोन चिमुकले जखमी झाले. या अपघातात दुध घेण्यासाठी जात असलेल्या शोभा रमेश पाटील यांना गंभीर दुखापत होवू त्यांचा जागीच मृत्यू झाला. कारच्या धडक्ेने संगीता प्रकाश महाजन (48), जयश्री जगदीश राऊत (30), सुमनबाई साहेबराव पाटील (65), अर्चना पाटील (40) या जखमी झाल्या. तर दोन लहान मुलं देखील जखमी झाले.

कारचालकाला जमावाकडून चोप
कार चालक कार चालक पवन कैलास पाटील यास अपघातानंतर जमावाने चांगलेच चोपले. त्यानंतर त्याला घटनास्थळी आलेल्या एमआयडीसी पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आले.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !