मुक्ताईनगरात खळबळ : जळगावच्या तरुणाची हत्या करीत मृतदेह नदीत टाकला


Excitement in Muktainagar : A young man of Jalgaon was killed and his body was thrown in the river मुक्ताईनगर : उसवारीने दिलेल्या पैशांसाठी तगादा लावत असलेल्या मित्राची हत्या करीत त्याचा मृतदेह पूर्णा नदीपात्रात फेकण्यात आला. मुक्ताईनगरात घडलेल्या या घटनेनंतर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. नितीन साहेबराव पाटील (25, रा.कला वसंत नगर, आसोदा रोड, जळगाव) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

पैशांच्या तगाद्यातून घटना
जळगाव शहरातील कला वसंत नगरमध्ये कुटुंबियांसह नितीन पाटील वास्तव्यास होता. काही दिवसांपूर्वी दिल्ली येथे रेल्वेत अप्रेंटीशीप करून तो जळगावी रतला होता. नितीनकडून मुक्ताईनगर येथील एका मित्राने एक लाख रुपये उसनवारीने घेतले मात्र उसनवारीने घेतलेले पैसे नितीन पाटील हा मागत असल्याने मित्राने त्याचा काटा काढण्याचे ठरवले.

मुक्ताईनगरात बोलावून केला खून
संशयित आरोपीने गुरुवार, 18 जुलै रोजी नितीनला मुक्ताईनगर येथे बोलावून घेतले व ोलारखेडा शिवारात नेऊन तेथे काही मित्रांच्या मदतीने त्याचा खून करून मृतदेह हात पाय बांधून पूर्णा नदी पात्रात फेकून दिला.

दरम्यान, नितीनसोबत असणार्‍या एका युवकाने पोलीस स्थानक गाठून काही जणांनी नितीनला कुंड गावाजवळच्या जंगलात मारून त्याचा मृतदेह पुर्णा नदीच्या पात्रात टाकून दिल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी या प्रकरणी माहिती देणार्‍या तरुणाकडून कसून चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणात अन्य आरोपींचा सहभाग असून त्याचा तपासदेखील सुरू आहे.

दहा तासानंतर आढळला मृतदेह
मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला माहिती कळताच पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी पहाटेपासून पूर्णा नदीपात्रात मृतदेहाचा शोध सुरू करण्यात आला. 10 तासांनी मयत नितीन पाटीलचा मृतदेह हात पाय बांधलेल्या अवस्थेत सापडला. खुनाच्या घटनेमुळे मुक्ताईनगर हादरले असून संशयीतांविरोधता मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !