वरणगाव शहरात अण्णाभाऊ साठे व महात्मा जोतिबा फुले सामाजिक सभागृहासाठी सव्वा कोटी मंजूर
माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रयत्नांना यश -नगराध्यक्ष सुनील काळे यांची माहिती
वरणगाव : शहरात मातंग समाज बांधवांसाठी नगरपरीषदेच्या वतीने अण्णाभाऊ साठे सामाजिक सभागृह व गट क्रमांक 417 व 418 मधील महात्मा जोतिबा फुले सामाजिक सभागृह, महात्मा फुले नगरात होण्यासाठी सव्वा कोटींचा प्रस्ताव प्रशासकीय मंजुरीसाठी जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांच्याकडे पाठवण्यात आला होता. वरणगाव शहरात सामाजिक कार्यक्रम लग्न यासह आनंदाचे कार्यासाठी सभागृह आवश्यक असल्याची मागणी नगराध्यक्ष सुनील काळे व मुख्यधिकार्यांसह नगरसेवकांनी केली होती. माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे हा विषय लावून धरण्यात आल्यानंतर जिल्हाधिकार्यांनी सव्वा कोटींच्या सभागृहासाठी मंजुरी दिली असल्याचे नगराध्यक्ष सुनील काळे यांनी सांगितले.
प्रशासनासह महाजनांचे मानले आभार
महात्मा ज्योतिबा फुले सामाजिक सभागृह 63 लक्ष रुपये खर्चातून सिद्धेशव्र नगरात तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सामाजिक सभागृहासाठी 63 लाख 58 हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत. दोन मंगल कार्यालयांना मंजुरी मिळाल्याने माजी मंत्री गिरीश महाजन व जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांचे नगराध्यक्ष सुनील काळे, उपनगराध्यक्ष शेख अखलाक, मुख्यधिकारी शामकुमार गोसावी, बांधकाम अभियंता गणेश चाटे व नगरसेवकांनी आभार मानले आहेत.



