पॅरीस ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिले पदक : मनू भाकरने 10 मीटर एयर पिस्टलमध्ये ब्रॉन्झ पटकावले.

पॅरीस : भारतीय नेमबाज मनू भाकरने इतिहास रचत पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात कांस्यपदक मिळवून दिले. ऑलिम्पिक इतिहासात नेमबाजीत पदक जिंकणारी मनू ही पहिली भारतीय महिला ठरली. मनू भाकरने तब्बल 12 वर्षांनंतर भारताला ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत पदक मिळवून दिले आहे. भारताला या खेळात 2012 मध्ये शेवटचे ऑलिम्पिक पदक मिळाले होते.
जोरदार कमबॅक अन भारताला मिळाले पद
2021 च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये मनूचे पिस्तूल खराब झाले होते. तिला 20 मिनिटे लक्ष्य करता आले नाही. पिस्तूल दुरुस्त केल्यानंतरही मनूला केवळ 14 शॉट्स मारता आले आणि ती अंतिम शर्यतीतून बाहेर पडली. मनू निराश झाली होती पण तिने कमबॅक केले आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी तिने अंतिम फेरीत 221.7 गुणांसह कांस्यपदक जिंकले.
कोरियाच्या ओ ये जिनने या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. तिने 243.2 गुण मिळवून ऑलिम्पिक विक्रम केला. कोरियाच्या किम येजीने रौप्यपदक जिंकले. तिने 241.3 गुण मिळवले.
