वादग्रस्त अधिकारी पूजा खेडकरांचे आयएएस पद रद्द : परीक्षेवर घातली बंदी


Controversial officer Pooja Khedkar’s IAS post cancelled : Exam banned नवी दिल्ली :  विविध आरोपांमध्ये सातत्याने प्रकाशझोतात आलेल्या वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांची उमेदवारी रद्द करण्यात आली असून त्यांना यूपीएससी परीक्षेला बसण्यावरही बंदी घालण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. भविष्यात आता खेडकर यांना आयएस वा आयपीएस होता येणार नाही. पूजा खेडकर यांनी नियमांचे उल्लंघन केल्याचं आणि त्यामध्ये त्या दोषी आढळल्यामुळे त्यांच्यावर ही मोठी कारवाई करण्यात आली.

जामिनावर उद्या होणार निर्णय
पूजा खेडकर यांनी दिल्लीतल्या पटियाला हाऊस कोर्टामध्ये अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला असून त्यावर कोर्ट उद्या निर्णय देणार आहे. त्यापूर्वी यूपीएससीने पूजा खेडकर यांच्याबाबत मोठा निर्णय घेतला. यूपीएससीने पूजा खेडकरचे आयएएस पद रद्द केले आहे. यूपीएससीने प्रेस नोट जाहीर केली आहे. यामध्ये पूजा खेडकरला 2022 साली आम्ही दिलेले आयएएस पद तात्पुरतं रद्द करत असल्याचे म्हटले आहे.

यूपीएससीने पूजा खेडकरचे आयएएस पद रद्द केल्यामुळे आता तिला भविष्यातील सर्व परीक्षा आणि निवडींमधून कायमचे काढून टाकण्याचे निर्देश दिले आहे. नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल पूजा खेडकरला दोषी ठरवण्यात आले आहे. पूजा खेडकरने आयएएस होण्यासाठी यूपीएससीची फसवणूक केल्याने तिच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे.

पूजा खेडकरविरोधात यूपीएससीने दिल्लीमध्ये गुन्हा दाखल केला होता. पूजा खेडकरला यूपीएससीने चौकशीसाठी बोलावले होते. पण ती अद्याप चौकशीसाठी हजर झालेली नाही. सध्या पूजा खेडकरचा फोन नॉटरिचेबल लागत आहे. त्यामुळे पूजा खेडकर सध्या कुठे आहे ? हे स्पष्ट झालेले नाही.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !