भुसावळात एफडीएची मोठी कारवाई : भेसळीच्या संशयातून 358 किलो खाद्यतेल जप्त

FDA action in Bhusawal: 358 kg of edible oil seized on suspicion of adulteration भुसावळ : जळगावातील अन्न व औषध प्रशासन विभागाने शहरातील श्रीकेश राजेश दुबे यांच्या मालकीच्या श्री लक्ष्मीनारायण ट्रेडिंग या दुकानात मंगळवारी छापेमारी करीत 358 किलो सुटे खाद्यतेल जप्त केले. या तेलाची किंमत 35 हजार 859 रुपये जप्त करीत व्यवसाय बंद करण्याची नोटीस बजावल्याने शहरातील व्यापारीवर्गात प्रचंड खळबळ उडाली आहे.
तेलात भेसळ असल्याचा संशय
जळगाव अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी एस.एम.पवार व ए. के. साळुंके यांच्या पथकाने मंगळवारी भुसावळातील बाजारपेठ भागात श्री लक्ष्मीनारायण ट्रेडिंग या दुकानात छापा टाकला. यावेळी पथकाने भेसळ असल्याच्या संशयावरून 178.4 किलो पामतेल व 178.4 किलो रिफाइंड सोयाबीन तेलाचा साठा जप्त केला. तेलाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. सहायक आयुक्त व्ही.पी.धवड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.