अवैधरित्या गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या वाहनांचा होणार लिलाव : यावलला आरटीओकडून मूल्यांकन तपासणी


यावल : यावल तहसील कार्यालयामध्ये विविध ठिकाणी अवैध गौण वाहतूक करतांना पकडण्यात आलेल्या वाहनांची आरटीओ प्रशासनाकडून मूल्यांकन करीत तपासणी करण्यात आली. वाहन मालकांनी वेळेत दंड न भरल्याने या वाहनांचा लिलाव केला जाणार आहे. आरटीओचे पथक तहसीलमध्ये आल्यानंतर त्यांनी 15 वाहनांची मूल्यांकना संदर्भात चाचणी केली आहे. लवकरच मूल्यांकन प्राप्त झाल्यानंतर या वाहनांचा लिलाव होईल.

15 वाहनांचा लवकरच होणार लिलाव
यावल तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते यांच्या मार्गदर्शनाखाली महसूलच्या गस्तीपथकाने विविध ठिकाणी अवैध गौण खनिजाची वाहतूक करणार्‍यांवर कारवाई करीत डंपरसह ट्रॅक्टर पकडले होते. पकडण्यात आलेल्या या वाहन मालकांना वेळेवरच दंडाची नोटीस देण्यात आली मात्र यातील 15 वाहन मालकांनी अद्यापही दंड न भरल्याने 15 वाहनांच्या लिलावास संदर्भात तयारी केली जात आहे. महसूल सहाय्यक सुदाम नागरे यांनी 15 वाहनांची यादी तयार करून जळगाव आरटीओकडे पाठवली. मूल्यांकन साठी वाहनांची पाहणी करण्यासाठी यावल तहसील कार्यालयामध्ये जळगाव आरटीओ मधून मोटर वाहन निरीक्षक चेतन चकोर, मोटर वाहन निरीक्षक राहुल काळे, लक्ष्मण आगलावेसह पथक दाखल झाले. या पथकाने वाहनांची मूल्यांकन संदर्भात चाचणी केली. लवकरच जळगाव आरटीओ यांच्याकडून अधिकृत मूल्यांकन प्राप्त होईल व त्यानंतर यावल तहसील कार्यालयात डंपर, ट्रॅक्टरसह विविध 15 वाहनांचा लिलाव होणार आहे.











मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !