वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकरचा जामीन फेटाळला : कोणत्याही क्षणी अटक !

नवी दिल्ली : वादग्रस्त अधिकारी पूजा खेडकर यांचा पटियाला हाऊस कोर्टाने अटकपूर्व जामीन फेटाळल्याने त्यांना केव्हाही अटक होण्याची शक्यता आहे. पूजा खेडकरला तिच्या चुकीच्या गोष्टी करण्यास मदत केली, हे तपासण्याचे निर्देशही न्यायालयाने दिल्ली पोलिसांना दिले आहेत.
सुरूवातीपासून वादात सापडल्या खेडकर
आलिशान कार आणि त्यावरील अंबर दिवा यामुळे वादात सापडलेल्या प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकरबाबत युपीएससीने बुधवारी मोठा निर्णय घेत तिला दोषी ठरवले आणि तिची उमेदवारीही रद्द केली. महाराष्ट्र केडरची प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर हिने बनावट कागदपत्रांचा वापर केल्याचे तपासात समोर आले.
15 हजार उमेदवारांचा तपासला डाटा
यूपीएससीने पूजा खेडकरला कारणे दाखवा नोटीस बजावत नागरी सेवा परीक्षा 2022 ची उमेदवारी का रद्द करण्यात येऊ नये?, अशी विचारणा केली शिवाय युपीएससीने गुन्हा दाखल करीत पूजाने बनावट कागदपत्र सादर करून परीक्षा दिली होती का, हे तपासण्यासाठी 2009 ते 2023 पर्यंत उत्तीर्ण झालेल्या 15 हजारांहून अधिक उमेदवारांचा डेटा तपासला.
