पोलिसांचा तरुणांशी समन्वय असणे काळाची गरज : सहाय्यक पोलीस अधीक्षक अन्नपुर्णा सिंग


रावेर (9 ऑगस्ट 2024) : अनुचित घटनांना आळा बसावा यासाठी पोलिसांना माहिती मिळणे आवश्यक आहे. शांतता कमिटीत तरूणाची संख्या कमी असून शांतता, सुव्यवस्था राखण्यासाठी तरुणांना पोलीस प्रशासनासोबत जोडणे आवश्यक आहे. समाज सशक्त करण्यासाठी युवा शक्तीचा उपयोग विधायक कामासाठी होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन सहाय्यक पोलीस अधीक्षक अन्नपुर्णा सिंग यांनी व्यक्त केले.

रावेर पोलीस ठाण्यात सहा.पोलीस अधीक्षक अन्नपुर्णा सिंग यांच्या अध्यक्षतेखाली शांतता कमिटीची बैठक पार पाडली. यावेळी रावेर पोलीस निरीक्षक डॉ.विशाल जयस्वाल, माजी नगराध्यक्ष हरीष गणवाणी, दिलीप कांबळे, नामदेव महाजन, डॉ.सुरेश पाटील, विजय लोहार, संतोष पाटील, निलेश पाटील, विजय लोहार, गयास शेख, युसूफ खान, शरद राजपूत, विजय पाटील यांच्यासह पोलीस पाटील उपस्थित होते. यावेळी डॉ.सुरेश पाटील व दिलीप कांबळे, हरिष गणवाणी यांनी मनोगत व्यक्त केले.


कॉपी करू नका.