लढणार नाही तोपर्यंत प्रस्थापित व्यवस्थेला या समूहांचे प्रश्न कळणार नाहीत : प्रा.जतीन मेढे


फैजपूर (9 ऑगस्ट 2024) : दलित, आदिवासी, उपेक्षित, स्त्रिया, शेतमजूर, शेतकरी आदी असंघटित समूहांचे मुख्य प्रश्न सामाजिक चळवळीमध्ये कार्य करणार्‍या शिक्षित व बुद्धीवादी कार्यकर्त्यांनी समजून घेतले पाहिजे व ते सोडवण्यासाठी शासन दरबारी संविधानिक मार्गाने प्रयत्न करायला हवेत. जोपर्यंत समाजातील बुद्धीवादी आणि विचारवंत वर्ग या शोषित समूहांच्या हक्कासाठी बोलणार नाही, लढणार नाही, तोपर्यंत प्रस्थापित व्यवस्थेला या समूहांचे प्रश्न कळणार नाहीत, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट प्रदेश सरचिटणीस प्रा.डॉ.जतीन मेढे यांनी व्यक्त केले.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट पक्षाच्या सामजिक न्याय विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ विचारवंत, लेखक, वक्ते माजी आमदार अण्णासाहेब अ‍ॅड.जयदेव गायकवाड (पुणे) यांच्यासह बोदवड पंचायत समितीचे माजी सभापती व राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे जळगाव पूर्व विभागाचे जिल्हाध्यक्ष किशोर गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे रावेर विभागाचे जिल्हा सरचिटणीस संघरत्न सपकाळे उपस्थित होते.


कॉपी करू नका.