हर घर तिरंगा अभियान : यावलच्या डॉ.कुंदन फेगडे यांच्याकडून ध्वजाचे वितरण
रावेर (13 ऑगस्ट 2024) : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्यानुसार हर घर तिरंगा अभियान राबवले जात आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत डॉ.कुंदन फेगडे (यावल) यांच्या माध्यमातून रावेर-यावल मतदारसंघातील रोझोदा, खिरोदा, सावखेडे बु.॥ व कुंभरखेडे येथे तिरंगा ध्वजाचे वितरण करण्यात आले.
नागरिकांनी घरावर फडकवा तिरंगा
डॉ.फेगडे यांनी प्रत्येक घरावर तिरंगा फडकवण्यासाठी देशभक्त नागरिकांना आवाहन केले. भारतीयांमध्ये देशभक्ती, राष्ट्राविषयी कृतज्ञ भाव जागृत करणे हे या अभियानाचे उद्दिष्ट असल्याचे ते म्हणाले. याप्रसंगी रोझोदा उपसरपंच चेतन भारंबे, सदस्य निखील सरोदे, हर्षल सोरोदे, भूषण राणे, रोशन धांडे, मनीष लोहार, मोहन मेढे, निपुण धांडे, मानस धांडे, ललित फेगडे, गोवर्धन ढाके, पंकज इंगळे, उमेश इंगळे, नानू माळी, पंकज झोपे, गिरीश झोपे. कुंभारखेडा येथील प्रदीप पाटील, उपसरपंच माधव चौधरी, शांताराम राणे, पंडित महाजन, हरीष चौधरी, निलेश पाटील, युवराज पाटील, गंगाराम राणे आदी उपस्थित होते.

