भुसावळात उद्या श्री फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
भुसावळ (13 ऑगस्ट 2024) : भुसावळ शहरातील श्री फाउंडेशनतर्फे गरीब गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप नाहाटा महाविद्यालयाजवळील धन्वंतरी मंदिरात बुधवारी दुपारी तीन वाजता करण्यात येणार आहे. यावेळी तहसीलदार निता लबडे, मुख्याधिकारी महेश वाघमोडे, नायब तहसीलदार अंगद असटकर, अॅड.तुषार पाटील, प्रा.सुनील नेवे आदींची उपस्थिती असेल. कार्यक्रमास उपस्थिती द्यावी, असे आवाहन श्री फाउंडेशनचे अध्यक्ष किरण मिस्त्री, अध्यक्ष सारंगधर (छोटूभाऊ) पाटील, उपाध्यक्ष रुपाली मिस्त्री, सचिव राजकुमार ठाकूर आदींनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.