गारबर्डी धरणावर तहसीलदारांच्या उपस्थितीत आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण
रावेर (13 ऑगस्ट 2024) : महसूल पंधरवड्यानिमित्त गारबर्डी धरणावर आपत्ती व्यवस्थापन अधिकार्यांच्या प्रमुख उपस्थितीत महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या संयुक्त प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. यावेळी बोटीद्वारे सुकी नदीत प्रत्यक्ष आपत्ती निवारणाचा अनुभव अधिकार्यांनी घेतला. महसूल पंधरवड्यानिमित्त आपत्ती व्यवस्थापन, शोध व बचाव पथकाच्या वतीने गारबर्डी धरणावर प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरवीरसिंग रावळ, तहसीलदार बी.ए.कापसे, अपर तहसीलदार मयुर कळसे, निवासी नायब तहसीलदार संजय तायडे, होमगार्ड अधिकारी तायडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिदास बोचरे, आपदा मित्र पथक, होमगार्ड अधिकारी व कर्मचारी, तहसील कार्यालयातील प्रवीण पाटील, तलाठी, मंडळ अधिकारी, कोतवाल आणि इतर नागरिक उपस्थित होते.
दिव्यांग बांधवांना प्रमाणपत्र वाटप
महसूल पंधरवड्यनिमित्ताने तहसील कार्यालयात दिव्यांग बांधवांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात दिव्यांग व्यक्तींची निवड करून अंत्योदय कार्ड वाटप करण्यात आले. संजय गांधी निराधार योजना मंजूर झालेल्या लाभार्थींना तहसीलदार बी.ए.कापसे यांच्याहस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. निवासी नायब तहसीलदार संजय तायडे, नायब तहसीलदार साळी, पुरवठा निरीक्षक डी.के.पाटील, संजय गांधी निराधार योजनेचे योगेश मोहिते व सुषमा घरडे उपस्थित होते.