जळगावात मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांना अपघात
Accident involving the vehicles of Chief Minister’s convoy in Jalgaon जळगाव (14 ऑगस्ट 2024) : जळगाव दौर्यावर आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्यातील एस्कॉर्टमधील पोलिसांची चार वाहने एकमेकांवर आदळली असून वाहनांचे किरकोळ नुकसान झाले तर सुदैवाने कुणीही जखमी झाले नाही. अपघाताची घटना मंगळवार, 13 ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास
कुसुंबा येथील विमानतळ परिसरात घडली.

वाहनांचे मोठे नुकसान
जळगाव येथील सागर पार्क येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सभेचे आयोजन करण्यात आले होते. या अनुषंगाने मंगळवार, 13 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कुसुंबा येथील विमानतळावर आगमन झाल्यानंतर पोलिसांच्या वाहनांचा ताफा जळगाव शहराकडे येण्यासाठी निघाला. त्यावेळी विमानतळ परिसरातच ताफ्यातील एस्कॉर्टमधील पोलिसांच्या चार वाहने एकमेकांवर आदळली. या अपघातात वाहनांचे किरकोळ नुकसान झाले मात्र सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी वा कुणीही गंभीर जखमी झाले नाही. अपघातात पोलिसांच्या वाहनाचे मोठे नुकसान झालय. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचा वाहनाचा ताफा लागलीच सभे ठिकाणी रवाना झाला.
