भुसावळातील दे.ना.भोळे महाविद्यालयात नशामुक्त भारत अभियान अंतर्गत नशामुक्तीची शपथ
भुसावळ (14 ऑगस्ट 2024) : शहरातील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात नुकतीच नशामुक्त भारत अभियान अंतर्गत नशामुक्तीची शपथ विद्यार्थ्यांना देण्यात आली. मादक पदार्थांच्या गैरवापरास प्रतिबंध करणे आणि भारतास अंमली पदार्थमुक्त बनवण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालयामार्फत नशामुक्त भारत अभियान राबवण्यात येत आहे.
यांची कार्यक्रमास उपस्थिती
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे माजी सदस्य आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.पी.फालक, विद्यार्थी विकास विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा.आर.डी.भोळे, नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्यचे जळगाव जिल्हा संघटक प्रा.डॉ.दयाघन राणे आणि सर्व प्राध्यापक उपस्थित होते. प्राचार्य डॉ.आर.पी.फालक म्हणाले की, व्यसनामुळे जीवन उद्ध्वस्त होते त्यामुळे तरुण पिढीपासून दूर रहावे, असे आवाहन त्यांनी केले. व्यसनमुक्तीच्या मार्गात काही अडचणी असतील तर महाविद्यालयाच्या मानस शास्त्र विभागात समुपदेशनाची सुविधा उपलब्ध असल्याचे ते म्हणाले. प्रा.डॉ.एस.व्ही.बाविस्कर यांनी उपस्थित विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि प्राध्यापक तसेच शिक्षकेतर कर्मचारी अश्या सर्व उपस्थितांना व्यसनमुक्तीची शपथ दिली. प्रसंगी नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांनी पुरवलेली व्यसनमुक्ती विषयक माहिती पत्रके ही विद्यार्थ्यांना देण्यात आली. प्रास्ताविक प्रा.आर.डी.भोळे यांनी तर सूत्रसंचालन सहायक विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.डॉ.अनिल सावळे यांनी केले. आभार महिला कार्यक्रम अधिकारी प्रा.संगीता धर्माधिकारी यांनी मानले. प्रा.डॉ.संजय चौधरी, प्रा.डॉ.जगदीश चव्हाण, प्रा.डॉ.जयश्री सरोदे, प्रा.डॉ.माधुरी पाटील, प्रा डॉ अंजली पाटील, प्रा डॉ माधुरी पाटील, प्रा एस डी चौधरी, प्रा.डॉ.जी.पी.वाघुळदे, प्रा.डॉ.आर.बी.ढाके, प्रा.श्रेया चौधरी, प्रा.जागृती सरोदे, प्रा.आरती नवघरे, प्रा.सुशीला भाटे, प्रा.गायत्री नेमाडे यांच्यासह विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

