कंडारीच्या तरुणाला 15 हजारांचा ऑनलाईन गंडा


युनियन बँकेचा मॅनेजर बोलत असल्याचे सांगून केली फसवणूक : ओटीपी न सांगितल्याने शिवीगाळ केल्याची तक्रार

भुसावळ : युनियन बँकेचा मॅनेजर बोलत असल्याचे सांगत आधार व पॅन कार्ड अपडेट नसल्याने खाते बंद होत असल्याने ते सुरू राहण्यासाठी मोबाईल क्रमांकावर आलेला ओटीपी क्रमांक सांगण्यास भाग पाडून अज्ञात भामट्याने कंडारीतील रहिवासी व मुंबईतील बी.ए.एम.एस.चे शिक्षण घेणार्‍या उच्च शिक्षीत तरुणाला 15 हजारांचा ऑनलाईन गंडा घातला. 28 फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजता ही घटना घडली. या प्रकरणी भुसावळ शहर पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, शहरात यापूर्वीदेखील गुगल पे, पेटीएम तसेच बँक खाते बंद करण्याचे कारण सांगत बँक खात्याचा तपशील मिळवून फसवणुकीचे प्रकार घडले आहेत. पोलिसांनी नागरीकांना सतर्क राण्याचे आवाहन करीत कुणालाही खात्याची माहिती न देण्यासह आलेल्या लिंकवर क्लीक वा ओटीनी न सांगण्याचे  आवाहन केले आहे.

ओटीपीला नकार दिल्याने केली शिवीगाळ
कंडारी येथील रहिवासी असलेल्या हर्षल सूर्यभान पाटील (19) यांनी शहर पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, 28 फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजता त्यांना 7679994216 या क्रमांकावरून कॉल आला, आपण कंडारी युनियन बँकेचे मॅनेजर बोलत असून आधार व पॅन कार्ड अपडेट न केल्याने खाते बंद करण्यात येत आहे मात्र खाते सुरू ठेवायचे असल्यास मोबाईलवर आलेला ओटीपी क्रमांक सांगावा, असे समोरील व्यक्तीने सांगितले मात्र हर्षल यांनी फसवणूक होण्याची शक्यता गृहित धरून ओटीपी क्रमांक सांगण्यास नकार दिला. यावेळी समोरील व्यक्तीने शिवीगाळ करीत क्रमांक न सांगितल्यास खात्यातील सर्व रक्कम काढून घेण्याची धमकी दिल्यानंतर काही वेळानंतर हर्षल यांना 15 हजार रुपये त्यांच्या खात्यातून ट्रान्सपर झाल्याचा मेसेज आला. तपास पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय तुळशीदास पवार करीत आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !