नाशिकमध्ये दंगल : दोन्ही समुदायातील 200 जणांवर गुन्हा


नाशिक (18 ऑगस्ट 2024) : बंद करण्याच्या आवाहनानंतर नाशिकमध्ये दोन समुदायात दंगल उसळली होती. याप्रकरणी पोलिसांनी 200 जणांवर गुन्हे दाखल केले तर 55 जणांवर जीवे ठार मारण्याच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला. यातील आठ संशयितांना अटक करण्यात आली आहे इतर गुन्ह्यांतही 12 संशयीत अशा एकूण 20 जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली. जिवे ठार मारण्याच्या प्रयत्नातील गुन्ह्यात 8 संशयितांना दोन दिवस तर दंगल भडकावणार्‍या 12 संशयितांना एक दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. चित्रीकरणाच्या आधारे 55 संशयितांची ओळख पटवण्यात आली.

याप्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, हेलबावडी मशीद, दूधबाजार येथे बाइक रॅलीमधील 15 ते 20 संशयितांनी दुकाने बंद असताना शिवीगाळ करत धार्मिक भावना दुखावतील अशा घोषणा देत परिसराची शांतता भंग केली व दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

60 संशयीतांची पटली ओळख
दंगल भडकावणे, बेकायदेशीर जमाव जमवणे आणि जिवे ठार मारण्याचा प्रयत्न असे सहा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 20 संशयितांना अटक करण्यात आली आहे. इतरांचा शोध सुरू आहे. 60 संशयितांची ओळख पटल्याचे परिमंडळ एकचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण म्हणाले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !