वादळी वार्‍यासह पाऊस : बोरखेडा शिवारात मका झाला जमीनदोस्त


मुक्ताईनगर (20 ऑगस्ट 2024) :  मुक्ताईनगर तालुक्यातील बोरखेडा शिवारात वादळी वार्‍यासह पावसाने शेतातील मक्याचे झाले नुकसान झाले आहे. पंचनामा करून भरपाईची मागणी शेतकर्‍यांकडून केली जात आहे.

पंचनाम्यासह भरपाईची मागणी
रविवार, 18 आगॅस्ट रोजी दुपारी दोन वाजेला मुक्ताईनगर तालुक्यातील कुर्‍हा परिसरात वादळी वार्‍यासह विजांच्या गडगडाटात पावसाला सुरुवात झाली. सुमारे एक ते दीड तास संततधार झालेल्या पावसाने कुर्‍हा परिसरातील अनेक भागात पाणीच पाणी झाले. बोरखेडा शिवारातील कवळाबाई तुकडू पवार (गट नं.223) या शेतकर्‍याच्या शेतातील तीन एकर मका पिकांचे नुकसान झाले आहे. मका पूर्णपणे जमीनदोस्त झाला. हाता-तोंडाशी आलेल्या पिकांचे झालेल्या नुकसान पाहता शेतकर्‍याकडून पंचनामा करून मदतीची अपेक्षा केली जात आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !