नाशिकमध्ये सेवानिवृत्त पोलिसाच्या मुलाची हत्या
Retired policeman’s son killed in Nashik नाशिक (21 ऑगस्ट 2024) : गुन्हेगारी डोके काढलेल्या नाशिकमध्ये पुन्हा तरुणाच्या खुनाची घटना समोर आली आहे. पंचवटीत मेरी परिसरातील तारवालानगर येथे निवृत्त पोलीस कर्मचार्याचा मुलगा असलेल्या गगन प्रवीण कोकाटे (28) या तरुणाची हत्या करण्यात आली आहे. या घटनेने नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे.
प्रेम प्रकरणात हत्येचा संशय
मेरी कंपाऊंड परिसरातील मराठा समाजाच्या वस्तीगृहाबाहेर मंगळवारी मध्यरात्री दोन ते अडीच वाजेच्या सुमारास अज्ञात संशयितांनी डोक्यात तीक्ष्ण हत्याराने वार करून तरुणाची हत्या केली. बुधवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास काही नागरिकांना रक्ताच्या थारोळ्यात गगन याचा मृतदेह आढळून आल्याने त्यांनी पंचवटी पोलिसांना घटनेची माहिती दिल्यानंतर खून झाल्याचे उघडकीस आले.

प्रेम प्रकरणातून हत्येचा संशय
या घटनेनंतर पोलीस कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. यावेळी पोलिसांना गगन याच्या खिशातून एक चिट्ठी मिळाली आहे. दरम्यान ही हत्या प्रथमदर्शनी प्रेम प्रकरणातून झाली असल्याचा संशय वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी व्यक्त केला.
