भुसावळातील दिव्यचक्षू भगिनींसाठी रोटरी व लायन्स क्लबचे भाऊ सरसावले


भुसावळ (21 ऑगस्ट 2024) : दिव्यचक्षू भगिनींसाठी रोटरी व लायन्स क्लबच्या भाऊंनी आपला हात पुढे केला. शहरातील खान्देश अंधकल्याण संघातर्फे आयोजित रक्षाबंधनाचा कार्यक्रम लिलाई हॉलमध्ये झाला.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
अध्यक्षस्थानी आरती चौधरी होत्या. खानदेश अंधकल्याण समितीचे अध्यक्ष संजय पाटील, अंधकल्याण संघाचे मानद पालक डॉ.बाळू पाटील, लायन्स तसेच क्लबचे गोपाळ अग्रवाल, झोनल चेअरमन डॉ.उमाकांत चौधरी, डॉ.नरेंद्र भोलाणे, राजेश पाटील, पी.व्ही. पाटील, रोटरी क्लब अध्यक्ष अनंत पाटील, गजानन ठाकूर, राजेश अग्रवाल उपस्थित होते. दिव्यचक्षू भगिनी विजया कोरडे यांनी स्वागत गीत म्हटले. आरती चौधरी यांनी प्रास्ताविकात राखी पौर्णिमेच्या सणाला भाऊ बहिणीचे रक्षण करण्याचे आश्वासन देतात. सर्व भावांच्या वतीने मी सर्व बहिणींना आश्वस्त करते की केवळ आजच नाही तर यापुढेही केव्हाही मदत लागली तर आम्ही सदैव तयार आहोत. संजय पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

स्नेहदीप निराधार महिला अंध आश्रम निर्माण होण्यासाठी मदतीचे आवाहन त्यांनी केले. 22 दिव्यचक्षू महिलांनी रोटरी क्लब व लायन्स क्लबच्या पदाधिकारी बंधूंना राखी बांधली. गोपाळ अग्रवाल, जयश्री ज्ञाती, संजय चौधरी, मामा पाचपांडे, डॉ.सुरेंद्र भिरुड, प्रमोद नेमाडे यांचे सहकार्य लाभले.
मामा पाचपांडे, गजानन ठाकूर, राजेश अग्रवाल, लक्ष्मण सोळंके, राजेंद्र पाटील, संजय चौधरी, सुरेश पाटील, शालिनी पाटील, कावेरी चौधरी उपस्थित होत्या. सूत्रसंचलन संध्या भोळे यांनी केले. प्रादेशिक मानद पालक डॉ.बाळू पाटील यांनी आभार मानले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !